Share Market Sakal
अर्थविश्व

बजेटआधी खरेदी करा 'हे' 3 शेअर्स, 1 वर्षसाठी पैसे गुंतवण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

सकाळ डिजिटल टीम

Budget Picks: बजेटपूर्वी मजबूत कमाई करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये चांगले शेअर्स समाविष्ट करायचे असतील, तर तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने खरेदी करू शकता. शेअर बाजार तज्ज्ञांनी तुमच्यासाठी 3 मजबूत स्टॉक्स निवडले आहेत आणि 1 वर्षासाठी पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. कोणते आहेत हे शेअर्स पाहुयात...

झेन टेक्नॉलॉजीज (Zen Technologies)

शेअर बाजार तज्ज्ञ आणि सेठी फिनमार्टच्या विकास सेठी यांनी आपल्या बजेट पिकमध्ये झेन टेक्नॉलॉजीजचा (Zen Technologies) समावेश केला आहे. विकास सेठी यांनी झेन टेक्नॉलॉजीजमध्ये पुढील एक वर्षासाठी पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकसाठी 325 रुपयांचे टारगेट देण्यात आले आहे. कंपनीची ऑर्डर बुकही जवळपास 425 कोटींची झाली आहे. येत्या काळात या कंपनीसाठी चांगली संधी असल्याचा विश्वास सेठी यांना आहे.

शारदा क्रॉपकेम (Sharda Cropchem)

शेअर बाजार तज्ज्ञ सिद्धार्थ सेदानी यांनी शारदा क्रॉपकेममध्ये (Sharda Cropchem) खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या याचे मूल्यांकन अर्थात व्हॅल्युएशन स्वस्त आहे आणि बजेटसाठी हा एक चांगला स्टॉक आहे. त्यांनी पुढील एक वर्षासाठी स्टॉकवर 480 रुपयांचे टारगेट दिले आहे. कंपनीची प्रोडक्ट लाइन-अप खूप मजबूत आहे. यासोबतच कंपनीचे डिस्ट्रिब्यूशन नेटवर्कही खूप मजबूत आहे.

अपोलो हॉस्पिटल (Apollo Hospitals)

मार्केट एक्सपर्ट सिद्धार्थ खेमका यांनी त्यांच्या बजेट पिकमध्ये अपोलो हॉस्पिटल्सचा समावेश केला आहे. येत्या अर्थसंकल्पात सरकारचे लक्ष हेल्थकेअर क्षेत्रावर असेल. बजेटसाठी हा सर्वोत्तम स्टॉक आहे. त्यांनी पुढील एक वर्षासाठी 5,900 रुपयांचे टारगेट या शेअरसाठी दिले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT