shapoorji-pallonji-and-tata Sons 
अर्थविश्व

‘आम्हीच समभाग विकत घेतो’; टाटा सन्सची शापूरजीला ऑफर

सकाळवृत्तसेवा

मुंबई - शापूरजी पालनजी समूहाला त्यांचे कर्ज फेडता यावे, यासाठी त्यांच्याकडील टाटा सन्सचे १८ टक्के समभाग खरेदी करून त्यांची कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्याची ऑफर टाटा सन्सने दिली आहे. शापूरजी पालनजी ग्रुपवर असलेला कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी आपण ही ऑफर देत असल्याचे टाटा सन्सतर्फे मंगळवारी (ता. २२) सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपले कर्ज फेडण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा या हेतूने शापूरजी समूह टाटा सन्समधील आपला हिस्सा गहाण ठेवण्याचा किंवा विकण्याचा प्रयत्न करत आहे. त्याविरोधात टाटा सन्सने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. मिस्त्री समूहाने टाटा समूहातील कुठलेही समभाग विकू नयेत वा गहाण ठेवू नयेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिला आहे. या याचिकेवरील आजच्या सुनावणीदरम्यान टाटा सन्सने ही ऑफर दिली.

शापूरजी समूहाने टाटा सन्समधील आपल्या वाट्यापैकी ८२ टक्के समभाग एक्‍सिस ट्रस्टी सर्व्हिसेस आणि आयडीबीआय ट्रस्टीशिप सर्व्हिसेसकडे गहाण ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा हा निर्णय रद्दबातल करावा, अशी टाटा समूहाची मागणी आहे. हा व्यवहार तीन हजार ९५७ कोटी रुपयांना झाल्याचे टाटाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT