Maturityवर मिळतील 28 लाख
Maturityवर मिळतील 28 लाख esakal
अर्थविश्व

LIC च्या या योजनेत दररोज 200 रुपये वाचवा! Maturityवर कमवा 28 लाख

शिल्पा गुजर

पॉलिसीमधील रिस्क कव्हर दर पाच वर्षांनी वाढतो.

LIC Jeevan Pragati Scheme : तुम्ही चांगल्या आणि सुरक्षित गुंतवणूक (Investment) प्लॅनच्या शोधात असाल तर, LIC तुमच्यासाठी अतिशय चांगला प्लॅन घेऊन आली आहे. LIC च्या जीवन प्रगती योजनेत (Jeevan Pragati Yojana) दररोज 200 रुपयांची बचत करून तुम्हाला 28 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळेल. LIC ची जीवन प्रगती स्कीम एक एंडोमेंट प्लॅन आहे, जी तुम्हाला सुरक्षिततेसोबतच बचत देखील देते. पॉलिसीमधील रिस्क कव्हर दर पाच वर्षांनी वाढतो.

मिनिमम एंट्री लिमिट

LIC च्या जीवन प्रगती योजनेत (Jeevan Pragati Yojana) गुंतवणूक करण्यासाठी किमान १२ वर्ष वय असावे. त्याच वेळी, या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष आहे. या पॉलिसीमध्ये तुम्हाला दर महिन्याला 6 हजार रुपये म्हणजेच दररोज 200 रुपये गुंतवावे लागतील. गुंतवणूकदार या पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त 20 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतात.

पॉलिसी धारकाचा पॉलिसीच्या मुदतीदरम्यान मृत्यू झाल्यास, मृत्यूवर विम्याची रक्कम + सिंपल रिवर्सनरी बोनस (जमा झालेला बोनस) + फायनल एडीशन बोनस (असल्यास) त्याच्या/तिच्या नॉमिनीला दिला जाईल.

गुंतवणुकीवर लाईफ कव्हर

LIC च्या जीवन प्रगती योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला बचतीसोबत संरक्षण मिळते. एलआयसीच्या या योजनेत, तुम्हाला नियमित प्रीमियम भरल्यावर डेथ बेनिफिटही (Death Benefit) मिळतो. त्याची रक्कम दर पाच वर्षांनी वाढते. तुम्ही पॉलिसी किती वर्ष घेतली आहे यावरही ते अवलंबून असते.

- खालील चार्ट पाहा

पहिल्या 0 ते 5 वर्षांसाठी, तुम्हाला 100 टक्के बेसिक मिळते.

6 ते 10 वर्षांच्या कार्यकाळात, तुम्हाला 125 टक्के पर्यंत बेसिक मिळते.

11 ते 15 वर्षांच्या कालावधीसाठी 150 टक्के बेसिक मिळतो.

त्याच वेळी, 16 ते 20 या वर्षांत 200 टक्के बेसिक मिळतो.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nor’westers: 'कालबैसाखी'च्या अभ्यासासाठी भारताचा पहिला प्रोजेक्ट लवकरच कार्यरत; जीवितहानी टळणार?

Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

IPL 2024 SRH vs GT Rain : हैदराबाद - गुजरात सामन्यात पावसाची शक्यता... सीएसके अन् आरसीबीला फुटला घाम

मोठी बातमी! पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक गाड्या दबल्या

Amit Shah : ..म्हणून PFI वर बंदी घातली! बिहारमध्ये गृहमंत्री अमित शाहांचा खुलासा; म्हणाले...

SCROLL FOR NEXT