Byju Raveendran esakal
अर्थविश्व

Byju's : 'बायजू'च्या तोट्यात 20 पटींनी वाढ, वित्तीय कामगिरीचा अहवाल आला समोर

'बायजू' ही देशातील सर्वात मोठ्या शैक्षणिक कंपन्यांपैकी एक आहे.

सकाळ डिजिटल टीम

'बायजू' ही देशातील सर्वात मोठ्या शैक्षणिक कंपन्यांपैकी एक आहे.

Byju's Report : आर्थिक अहवालाच्या (Financial Reporting) संरचनेतील बदलाच्या परिणामांचा उल्लेख करत फर्मचे संस्थापक बायजू रवींद्रन (Byju Raveendran) यांनी पुढील वर्षाबद्दल आशावाद व्यक्त केलाय. बायजू रवींद्रन म्हणाले, 'पुढील वर्षाचे निकाल खूप चांगले असतील. आर्थिक वर्ष 20 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 21 मध्ये व्यवसायात लक्षणीय वाढ झाली. कंपनीच्या खात्यांचं ऑडिट डेलॉइट हॅस्किन्स अँड सेल्सद्वारे (Audit Deloitte Haskins & Sales) केलं जातं, जे जागतिक स्तरावर चार सर्वात मोठ्या कर सल्लागार कंपन्यांपैकी एक आहे.'

बायजू रवींद्रन, दिव्या गोकुलनाथ आणि रिजू रवींद्रन यांनी 2011 मध्ये स्थापन केलेली बायजू ही देशातील सर्वात मोठ्या शैक्षणिक कंपन्यांपैकी एक आहे. आज, त्याची संपूर्ण भारतात 200 हून अधिक सक्रिय केंद्रं आहेत आणि या वर्षाच्या अखेरीस 500 पर्यंत वाढवण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. ऑनलाइन शिकवणीतील नवतंत्रज्ञानाधारीत कंपनी आणि देशातील सर्वाधिक मूल्यांकन मिळविणारा नवउद्यमी उपक्रम असलेल्या बायजूनं मोठ्या प्रतीक्षेनंतर तिची वित्तीय कामगिरी अखेर बुधवारी जाहीर केली.

वर्षभरापूर्वीच्या म्हणजे, आर्थिक वर्ष २०२०-२१ सालाच्या विलंबानं जाहीर केलेल्या या ताळेबंदानुसार कंपनीचा महसूल घसरलाच, तर तोटाही 20 पटींनी वाढला आहे. कंपनीनं प्रसिद्ध केलेल्या निकालानुसार, २०२०-२१ या वर्षभरात बायजूचा महसूल एकत्रित आधारावर ३ टक्के घसरून २,४२८ कोटी रुपये झाला आहे. २०१९-२० या आधीच्या वर्षांत तो २,५११ कोटी रुपयांवर होता. तर, बायजूनं त्या आर्थिक वर्षांत ४,५८८ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे, जो २०१९-२० मधील २३१.६९ कोटी रुपयांच्या एकत्रित तोट्यांच्या तुलनेत जवळपास 20 पट अधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT