E-Shram Card sakal
अर्थविश्व

E-Shram Card : शेतकऱ्यांना मिळू शकतो का ई-श्रम कार्ड योजनेचा लाभ? वाचा काय आहे नियम

सरकारकडून थेट कामगारांच्या खात्यावर आर्थिक मदत पाठवली जाते.

सकाळ डिजिटल टीम

देशातील असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांना एकत्र आणण्यासाठी ई-श्रम कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार मजूर आणि कामगारांना आर्थिक मदत करते. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने विकसित केलेल्या ई-श्रम पोर्टलवर आतापर्यंत 28.42 कोटी लोकांची नोंदणी झाली आहे.

ई-श्रम योजनेचे फायदे :

सर्व मजूर आणि शेतकरी यांना सरकारी योजनांचा लाभ एकाच व्यासपीठावर मिळावा या उद्देशाने ई-श्रम पोर्टल सुरू करण्यात आले. या योजनेअंतर्गत सरकार 2 लाख रुपयांचा अपघात विमा देते. यासोबतच काही मजुरांना हप्त्याच्या स्वरूपात आर्थिक मदतही दिली जाते. मात्र, या पोर्टलवर भविष्यात सरकारकडून कोणतीही योजना सुरू झाल्यास त्याअंतर्गत सर्वांना लाभ दिला जाईल.

हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

ई-श्रम योजनेचा लाभ कोणाला मिळेल?

फेरीवाले, भाजी विक्रेते, घरकामगार, अल्पकाळ काम करणारे युवक, इतर मजूर, शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यासोबतच या पोर्टलवर नोंदणी करता येईल. जर कोणी कर भरला तर तो ई-लेबर कार्डसाठी अर्ज करू शकत नाही.

शेतकरी नोंदणी करू शकतात का?

शेतकर्‍यांबाबत, ई-श्रम पोर्टलवर हे स्पष्ट करण्यात आले आहे की, केवळ शेतमजूर आणि भूमिहीन शेतकरीच ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यास पात्र आहेत. स्वत:ची जमीन असलेल्या शेतकर्‍यांचा या योजनेत समावेश नाही. ई-श्रम कार्ड फक्त असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे. जे घरगुती कामगार, स्वयंरोजगार कामगार किंवा असंघटित क्षेत्रातील पगारदार कामगार आहेत त्यांना असंघटित कामगार म्हणतात. असंघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेते आणि घरकामगार यांचा समावेश होतो.

ई-श्रम कार्डसाठी नोंदणी कशी करावी ?

आतापर्यंत सुमारे 28.50 कोटी लोकांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक 8.2 कोटी नोंदणी यूपीमधून झाली आहे. तुम्ही पोर्टलवर स्वत:ची नोंदणी करू शकता. सर्व प्रथम ई-श्रम पोर्टलवर जा आणि नंतर ई-श्रम वर नोंदणी पर्यायावर क्लिक करा.

आता तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि OTP आल्यावर तो भरावा लागेल. यानंतर ई-लेबर फॉर्म भरा आणि सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुमची नोंदणी पूर्ण होईल आणि तुम्ही काही दिवसांत तो डाउनलोड करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT