Changes in charitable donations donor given certificate of donation from charity along with receipt  sakal
अर्थविश्व

धर्मादाय संस्थांच्या देणग्यांतील बदल

दानकर्त्यास त्याने दिलेल्या देणगीच्या पावतीबरोबर संबंधित धर्मादाय संस्थेकडून देणगीचे प्रमाणापत्र दिले जाणे नव्या बदलानुसार आवश्यक करण्यात आले आहे.

डॉ. दिलीप सातभाई(चार्टर्ड अकाउंटंट)

प्राप्तिकर कायद्यात झालेल्या बदलानुसार आता एक एप्रिल २०२२ पासून प्रत्येक नोंदणीकृत धर्मादाय न्यास किंवा संस्था यांना एका आर्थिक वर्षात त्यांना प्राप्त झालेल्या सर्व देणग्यांची सर्वकष माहिती फॉर्म ‘१०बीडी’ नमुन्यानुसार तपशीलवारपणे सादर करणे बंधनकारक...

प्राप्तिकर कायद्यात झालेल्या बदलानुसार आता एक एप्रिल २०२२ पासून प्रत्येक नोंदणीकृत धर्मादाय न्यास किंवा संस्था यांना एका आर्थिक वर्षात त्यांना प्राप्त झालेल्या सर्व देणग्यांची सर्वकष माहिती फॉर्म ‘१०बीडी’ नमुन्यानुसार तपशीलवारपणे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर दानकर्त्यास त्याने दिलेल्या देणगीच्या पावतीबरोबर संबंधित धर्मादाय संस्थेकडून देणगीचे प्रमाणापत्र दिले जाणे नव्या बदलानुसार आवश्यक करण्यात आले आहे.

यामुळे प्राप्तिकर कायद्यातील उत्पन्नातून देणग्यांच्या रकमेची वजावट मिळण्यासाठी देणगीच्या पावती समवेत आता १०बीइ नमुन्यात धर्मादाय संस्थेकडून देणगीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक झाले आहे. धर्मादाय संस्थेने भरावयाचा ‘१०बीडी’ फॉर्म इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वर्षातून किमान एकदा प्राप्तिकर विभागात दाखल करावा लागणार आहे. यंदाच्या ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी हा फॉर्म दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२२ निश्चित करण्यात आली आहे.

हा फॉर्म कसा भरावा लागेल?

जर देणगीदाराचा प्राप्तिकर विभागाकडून राष्ट्रीय सूचित प्रदान केलेला पॅन, आधार, पासपोर्ट क्रमांक असेल तरच हा फॉर्म भरता येईल. प्रिन्सिपल डायरेक्टर जनरल ऑफ इन्कम टॅक्स (सिस्टीम्स) किंवा प्राप्तिकर महासंचालक (सिस्टीम्स) यांनी ठरवून दिलेल्या प्रक्रियेनुसार, संस्थेच्या प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणाऱ्या अधिकृत व्यक्तीद्वारेच एकापेक्षा अधिक हे फॉर्म दाखल केले जाऊ शकतात. या फॉर्मचे दोन भाग असून, ‘अ’ भागात धर्मादाय संस्थेचा पॅन व कोणत्या वर्षासाठी हा फॉर्म असेल आदींची माहिती आहे, तर ‘ब’ भागात प्राप्तिकर विभागाकडून दानकर्त्यास राष्ट्रीय सूचित प्रदान केलेला ‘अनन्य ओळख क्रमांक’, त्याचे नाव, पत्ता, देणगीची रक्कम; तसेच सेक्शन कोडमध्ये देशी-परदेशी व्यक्तीस ज्या कलमाच्या अंतर्गत देणगीदाराला देणगीसाठी वजावट हवी आहे, त्यापैकी कलम ८०जी, ३५(१)(ii), (iia), (iii) असणाऱ्या चार पर्यायांपैकी एकाचा उल्लेख करणे आवश्यक आहे.

याखेरीस देणगी ही कॉर्पस, विशेष अनुदान वा इतर बाबींसाठी दिली आहे काय, हे विषद करावे लागेल. देणगीची रक्कम रोख वा रेखांकित धनादेश, डीडी, इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत पाठविली आहे काय, हे पण स्पष्ट करावे लागेल. हा फॉर्म दाखल करणे बंधनकारक केल्यामुळे, उत्पन्नातून वजावट मिळण्यासाठी देणगीदाराने आता केवळ देणगीच्या पावतीबरोबरच देणगीचे प्रमाणपत्र धर्मादाय संस्थेकडून मिळवणे बंधनकारक आहे. त्यामुळे हा फॉर्म नसल्यास देणगीची उत्पन्नातून वजावट मिळण्यास अडचणी निर्माण होतील, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे देणगीदारांनी धर्मादाय संस्थेकडून देणगी दिल्याच्या पावतीबरोबरच प्रमाणपत्र मिळविणे हे नव्याने लक्षात ठेवावे लागणार आहे.

मूलभूत बदल कोणते?

करदात्याने प्राप्तिकर विवरणपत्रात जरी ८०जी वा इतर कलमांतर्गत उत्पन्नातून वजावट मागितली असली तरी संबंधित देणगी मिळणाऱ्या न्यास वा संस्थेने त्यास वरील फॉर्म १०बीडी दाखल करून पुष्टी दिल्याशिवाय करदात्याची या कलमांतर्गत उत्पन्नातून मिळणारी वजावट मान्य केली जाणार नाही, असे यातून आता सूचित होत आहे. पूर्वी अशी वजावट कलम ८० जी किंवा इतर कलमांतर्गत केवळ प्राप्तिकर विवरणपत्रात दानग्रहण करणाऱ्या संस्थेचा कायम खाते क्रमांक देऊन मिळत असे. त्यामुळे हा फार मोठा बदल ठरणार आहे. त्यामुळे खोट्या वा न दिलेल्या छोट्या-मोठ्या देणग्या दाखवून कर चुकविणाऱ्या करदात्यांना ही मोठी चपराक ठरणार आहे

फॉर्म १० बीडी दाखल न करण्याचे तोटे

  • फॉर्म १० बीडी प्राप्तिकर विभागात वेळेत दाखल न केल्यास हा फॉर्म दाखल करणाऱ्या धर्मादायी संस्थेस कलम २३४जी नुसार प्रत्येक दिवसाच्या विलंबास रु. २०० इतके विलंब शुल्क आकारले जाईल.

  • फॉर्म १०बीडी मध्‍ये देणगीचे विवरण भरण्‍यास खूप उशीर झाल्यास विलंब शुल्काव्यतिरिक्त कलम २७१ के अंतर्गत किमान रु. १० हजार व कमाल रु. एक लाख इतका दंड देखील आकारला जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon child shopping: आता बोला...! आई-वडील झोपेतच अन् तिकडं त्यांच्या लाडक्या चिमुकल्यानं चक्क 'अमेझॉन'वर केली अडीच लाखांची खरेदी

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

MLA Rahul Kul : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडीत बंधारे उभारावेत; आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

SCROLL FOR NEXT