Mrugank-Paranjape
Mrugank-Paranjape 
अर्थविश्व

कमोडिटी बाजार - आडवाटेवरचा आकर्षक गुंतवणूक पर्याय

गौरव मुठे

थोडी आडवाटेवरची आणि जोखमीची गुंतवणूक म्हणून कमोडिटी बाजाराविषयी सामान्य गुंतवणूकदारांमध्ये समज आहे. योग्य नियोजन आणि अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास ‘कमोडिटी’ गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. कमोडिटी बाजाराविषयी नुकताच ‘मल्टी कमोडिटी एक्‍स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड’चे (एमसीएक्‍स) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मृगांक परांजपे यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला. त्या मुलाखतीचा संपादित अंश...

कमोडिटी बाजार आणि त्यातील गुंतवणुकीसाठी काय आवश्‍यक आहे?
उत्तर - भारतात ‘मल्टी कमोडिटी एक्‍स्चेंज ऑफ इंडिया’ या कमोडिटीसाठीच्या स्वतंत्र बाजारात २००२ मध्ये ‘ट्रेडिंग’ सुरू झाले. ‘एमसीएक्‍स’ मंचावर सोने-चांदी, मूलभूत धातू, ऊर्जा आणि शेतमाल (ॲग्री कमोडिटी) व्यवहार होतात. विविध धातू, शेतीशी निगडित उत्पादने यांच्या बाजारपेठांमधून जे व्यवहार होतात ते ‘स्पॉट ट्रेडिंग’ प्रकारात येतात. हे व्यवहार ‘एमसीएक्‍स एक्‍स्चेंज’द्वारे होत नाहीत. पुढील एक किंवा दोन महिन्यांच्या कालावधीसाठी होणारे वायदा बाजारातील व्यवहार ‘एमसीएक्‍स’मध्ये होतात. कमोडिटी बाजार हा वायदा बाजार असल्यामुळे छोट्या रकमेत गुंतवणूकदारांना व्यवहार करण्याची संधी मिळते. 

‘ॲग्रिकल्चर कमोडिटी’मधील गुंतवणुकीचा ओघ वाढतो आहे. त्याबद्दल काय सांगाल?
उत्तर - ‘एमसीएक्‍स’मध्ये मुख्यत: धातू आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित कमोडिटीची प्रचंड उलाढाल आहे. मात्र, मेंथा ऑइल, कॉटनसारख्या कमोडिटींना चांगला प्रतिसाद आहे. ॲग्रिकल्चर कमोडिटीत ‘एमसीएक्‍स’ने जवळपास २५ टक्के हिस्सा मिळवला आहे. ॲग्री कमोडिटीसंदर्भात व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी ‘एमसीएक्‍स’ प्रशिक्षण शिबिरे आयोजित करते. सर्वसामान्यांबरोबरच धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या व्यक्तींकडे कमोडिटी बाजाराविषयी माहितीचा अभाव असल्याने या बाजाराचा म्हणावा तितका विकास झाला नाही. भारत कृषिप्रधान देश असल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र शीतगृहांच्या अपुऱ्या सुविधा, मर्यादित गुंतवणूक यांसारख्या अनेक कारणांमुळे ॲग्रिकल्चर कमोडिटीचे ट्रेडिंग होण्यात अडचणी आहेत. हे अडथळे दूर केल्यास कमोडिटी व्यवहारांना चालना मिळेल. 

‘बीएसई’ आणि ‘एनएसई’ यांनी कमोडिटी डेरिव्हेटीव्हजमधील सौदे सुरू केले. स्पर्धा वाढल्याचे जाणवते का? 
उत्तर - ‘बीएसई’ आणि ‘एनएसई’सारख्या जुन्या एक्‍स्चेंजला कमोडिटी डेरिव्हेटीव्हजमध्ये सौदे सुरू केल्याने कमोडिटी बाजाराचा पाया अधिक मजबूत होईल. एक्‍स्चेंज वाढल्याने कमोडिटीतील ‘ट्रेडिंग’ आणि लिक्विडीटी वाढण्यास मदत मिळेल. ‘एमसीएक्‍स’च्या उलाढालीवर काही परिणाम होणार नाही. नवीन स्पर्धक उतरल्याने कदाचित गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता निर्माण होऊन निकोप स्पर्धेचे वातावरण निर्माण होईल. 

करन्सी सेगमेंट सुरू करण्याबाबत ‘एमसीएक्‍स’चा विचार आहे का? 
उत्तर - ‘एमसीएक्‍स’ हे पहिल्यापासून कमोडिटीशी संलग्न असून, तेच आमचे कार्यक्षेत्र असल्याचे आम्ही मानतो. त्यामुळे सध्या तरी आम्ही कमोडिटीशी एकनिष्ठ राहणार आहोत. त्यामुळे आज तरी इतर कोणत्याही ‘ॲसेट क्‍लास’मध्ये उतरण्याचा आमचा विचार नाही. 

‘सेबी’ने कमोडिटी बाजारांना कस्टोडीएल सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली. याबाबत काय सांगाल? 
उत्तर - म्युच्युअल फंड कंपन्या आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसला आता ‘कमोडिटी’ श्रेणीत पदार्पण करता येईल. ‘एसआयपी’तून दर महिन्याला इक्विटी मार्केटमध्ये साधारणत: पाच ते आठ हजार कोटी येतात. त्यातील एक ते दोन टक्के गुंतवणूक जरी कमोडिटी बाजारात आली तर नक्कीच उलाढाल वाढेल. ‘एसआयपी’मध्ये ‘इक्विटी आणि डेट’ व्यतिरिक्‍त ‘कमोडिटी’चा पर्याय उपलब्ध झाल्यास कमोडिटी एक्‍स्चेंज आणि गुंतवणूकदार या दोघांना फायदा होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT