अर्थविश्व

एलपीजी सिलिंडर 2 रुपयांनी महाग

वृत्तसंस्था

नवी  दिल्ली: घरगुती वापरासाठीचे एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 2 रुपयांची वाढ झाली आहे. एलपीजी डिलर्सच्या कमिशनमध्ये सरकारने वाढ केल्यानंतर एलपीजी सिलिंडरच्या दरात 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची दिल्लीतील किंमत 507.42 रुपये असणार आहे. याआधी दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 505.34 रुपये होती. पेट्रोलियम कंपन्यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. सप्टेंबर 2017 मध्ये 14.2 किलो सिलिंडरचे वितरकांचे कमिशन 48.89 रुपये तर 5 किलो सिलिंडरसाठीचे कमिशन 24.20 रुपये होते. 

वाहतूक खर्चातील वाढ तसेच इतर खर्चामधील वाढ यामुळे पेट्रोलियम मंत्रालयाने वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार 14.2 किलो सिलिंडरचे वितरकांचे कमिशन 50.58 रुपये तर 5 किलो सिलिंडरसाठीचे कमिशन 25.29 रुपये असणार असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे दिली आहे. महिनाभरात एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 1 नोव्हेंबर रोजी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 2.94 रुपयांची वाढ झाली होती. मुंबईत 14.2 किलो सिलिंडरची किंमत 505.05 रुपये तर कोलकात्यात 510.70 रुपये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT