cotton yarn sakal media
अर्थविश्व

कोरोनाकाळातही कॉटर्न यार्नला मागणी; कॉटन असोसिएशनची माहिती

कृष्ण जोशी

मुंबई : कोरोना लॉकडाऊन (corona lockdown) काळातही कॉटन यार्नला (cotton yarn) मागणी (demand) वाढली आहे. मात्र त्याचवेळी या हंगामातील कापूस उत्पादन (cotton production) कमी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (cotton association of India) ने वर्तविला आहे.

देशातील 2020-21 चा कापूस हंगाम ऑक्टोबर पासून सुरु झाला आहे. त्यात जुलै महिन्यात देशात 354 लाख गाठींचे (प्रत्येकी 170 किलोच्या) कापसाचे उत्पादन होईल. ते उत्पादन पूर्वीच्या अंदाजापेक्षा दीड लाख गाठींनी कमी असेल, असेही असोसिएशनच्या सांख्यिकी समितीच्या बैठकीत सांगण्यात आले.

यात उत्तर विभागाच्या अंदाजात फारसा बदल झाला नसून तो साडेपासष्ठ लाख गाठी एवढाच राहिला आहे. मध्य विभागाच्या कापूस उत्पादनाचा अंदाज अर्धा लाख गाठींनी कमी होऊन तो 193.50 लाख गाठी एवढा झाला. गुजरातबाबतचा अंदाजही अडीच लाखांनी तर मध्य प्रदेशचा अंदाज अर्धा लाखांनी कमी झाला. महाराष्ट्राच्या कापूस उत्पादनाचा अंदाज दीड लाख गाठींनी वाढला आहे.

दक्षिण विभागाचा अंदाज एक लाख गाठींनी कमी झाला असून तो साडेनव्वद लाख गाठी एवढा झाला आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, ओरिसा यांच्याबाबतचा अंदाज तोच असून तेलंगणाचे उत्पादन एक लाख गाठींनी कमी होण्याची शक्यता आहे. कोरोना काळातही कॉटन यार्नची मागणी वाढली असून भारताने दहा लाख कापसाच्या गाठी आयात केल्या तर त्याचवेळी 77 लाख गाठी निर्यात केल्या, असेही असोसिएशनने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neha : 18 वर्षांचं करियर, 14-15 चित्रपट, 9 तर निघाले फ्लॉप..तरीही आज 40,00,00,000 कोटी संपत्तीची मालकीण, राजकीय घराण्याशी खास कनेक्शन

CET Exam : मार्च ते मे दरम्‍यान परीक्षा! इंजिनिअरिंग, फार्मसीसह विविध सीईटी परीक्षांच्या संभाव्य तारखा जाणून घ्या

Satara Politics : दोन्ही राजांचे आवाहन धुडकावले! साताऱ्यात २४ प्रभागांत बंडखोरी; नगराध्यक्षपदासाठी नऊ जणांत लढत

धनंजय मुंडे परळीतच बरे! अजितदादांनी दिलेल्या नवीन जबाबदारीला राष्ट्रवादीच्याच आमदाराचा विरोध

Pakistan Arms Smuggling India : पाकिस्तानातून ड्रोनद्वारे हाय-क्वालिटी बंदुका भारतात; सिकंदर शेख प्रकरणानंतर दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT