sam bankman-fried sakal
अर्थविश्व

Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सीच्या सीईओचा जामीन नाकारला; वाचा काय आहे प्रकरण?

दोषी आढळल्यास त्याला 115 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

सकाळ डिजिटल टीम

न्यायालयाने FTX चे संस्थापक सॅम बँकमन-फ्राइड यांना जामीन देण्यास नकार दिला आहे. सोमवारी सॅम बँकमन-फ्राइडला फसवणूक आणि नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. फ्राइडवर अब्जावधी डॉलर्सचा गैरवापर केल्याचा आणि अमेरिकेतील सर्वात मोठ्या आर्थिक फसवणुकीतील कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

8 फेब्रुवारीपर्यंत त्याला बहामास सुधारगृहात पाठवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या आठवड्यात क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजलाही मोठ्या घसरणीचा सामना करावा लागला आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

सॅम बँकमन-फ्राइडवर खर्च आणि कर्जे देण्याऐवजी त्यांच्या क्रिप्टो हेज फंड, अल्मेडा रिसर्च एलएलसीच्या वतीने गुंतवणूक करण्यासाठी FTX गुंतवणूकदारांच्या ठेवींचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. फ्राइडने चुकीची माहिती सांगितल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच फसवणूकीतून मिळालेले पैसे लपविण्याचा प्रयत्न केला आहे, असे आरोप फ्राइडवर आहेत.

रॉयटर्सच्या मते, बँकमन-फ्राइडने यापूर्वी ग्राहकांची माफी मागितली आहे आणि एफटीएक्सच्या अपयशाची कबुली दिली आहे, परंतु वैयक्तिकरित्या फ्राइडला असे वाटत नाही की, त्याच्यावर कोणतेही गुन्हेगारी दायित्व आहे.

सर्व बाबींवर दोषी आढळल्यास, त्याला 115 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो. CFTC ने डिजिटल कमोडिटी मालमत्तेमध्ये फसवणूक केल्याचा आरोप करत बँकमन-फ्राइड, अल्मेडा आणि FTX विरुद्ध खटला दाखल केला आहे.

FTX ची अनियमितता समोर आल्यानंतर काही दिवसांतच फ्राइडची 16 डॉलर अब्जची संपत्ती शून्यावर आली. त्यांला एकाच दिवसात 14.5 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT