Gold Rates esakal
अर्थविश्व

आजपासून सोनं खरेदी महागलं, आयात शुल्कात 5 टक्के वाढ

नव्या घोषणेनंतर आता सोन्यावर 15 टक्के आयात शुल्क भरावे लागणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : परदेशातून सोने आयात (Gold Import) करणे आता महाग झाले आहे. कारण सरकारने सोन्यावरील आयात शुल्क (Import Duty ) 7.5 टक्क्यांवरून 12.50 टक्के केले आहे. सोन्याच्या (Gold) वाढत्या आयातीला आळा घालण्यासाठी सरकारने ही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या घोषणेनंतर आता सोन्यावर 15 टक्के आयात शुल्क भरावे लागणार आहे. कारण 12.50 टक्के आयात शुल्काव्यतिरिक्त त्यावर 2.50 टक्के कृषी इंफ्रास्ट्रक्टर डेवलपमेंट सेसदेखील स्वतंत्रपणे आकारला जातो. त्यामुळे सोन्यावरील आयात शुल्क उपकर 10.75 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ( Gold Import Duty News In Marathi )

हा निर्णय का घेतला गेला

भारत (India) हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा आयातदार देश आहे. भारत आपली सोन्याची बहुतांश मागणी आयातीद्वारे पूर्ण करतो, ज्यामुळे रुपयावर दबाव येत होता. रुपयाची सातत्याने घसरण होत असल्याने त्याचा परिणाम भारतीय चलनावर दिसून येत आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आज भारतीय रुपयाने 79 रुपयांचा विक्रमी नीचांक गाठला.

मे महिन्यात 107 टन सोन्याची आयात

वित्त मंत्रालयाने (Finance Ministry) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोन्याच्या आयातीत अचानक वाढ झाली आहे. मे 2022 मध्ये केवळ 107 टन सोन्याची आयात झाली होती. त्यानंतर जून महिन्यातही सोन्याची मोठ्या प्रमाणात आयात झाल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सोन्याच्या आयातीत वाढ झाल्यामुळे चालू खात्यातील तुटीवर दबाव वाढत असल्याने सरकारला सोन्यावरील आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे स्पष्टीकरण मंत्रालयाच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT