Dabur  sakal
अर्थविश्व

Badshah Masala : 'बादशाह मसाला' आता डाबर इंडियाच्या मालकीचा; इतक्या कोटींची झाली डील

देशातील सुप्रसिद्ध कंपनी डाबर इंडिया आता मसाल्यांच्या व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहे.

सकाळ डिजिटल टीम

डाबर इंडियाने बादशाह मसालामधील ५१ टक्के हिस्सा ५८७.५२ कोटी रुपयांना विकत घेण्याची घोषणा केली आहे. दोन्ही कंपन्यांनी जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, बादशाह मसाला प्रायव्हेट लिमिटेडमधील 51 टक्के भागभांडवल विकत घेण्याचा करार डाबरने केला आहे.

देशातील सुप्रसिद्ध कंपनी डाबर इंडिया आता मसाल्यांच्या व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहे. कंपनीने बादशाह मसाल्यांच्या ब्रँडमध्ये 51 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. या करारानंतर आता बादशाह मसाला डाबर इंडियाकडे आहे. सप्टेंबर तिमाहीत डाबर इंडियाच्या नफ्यात घट झाली होती. सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करण्यासोबतच कंपनीने बादशाह मसालामधील भागभांडवल विकत घेण्याचीही घोषणा केली आहे.

डाबर इंडियाने बादशाह मसालामधील ५१ टक्के भाग ५८७.५२ कोटी रुपयांना विकत घेण्याची घोषणा केली आहे. डाबर इंडियाचा फूड बिझनेस तीन वर्षांत 500 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा मानस आहे.

दोन्ही कंपन्यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, बादशाह मसाला प्रायव्हेट लिमिटेडमधील 51 टक्के भागभांडवल विकत घेण्यासाठी डाबरने करार केला आहे. या करारानंतर बादशाह मसाला आता डाबर इंडियाच्या मालकीचा असेल. निवेदनानुसार, बादशाह मसाला सध्या मिश्रित मसाले आणि खाद्यपदार्थांचे उत्पादन, विक्री आणि निर्यात करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळानं उडता तीर अंगावर घेतलाय, ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांनाच....; अजितदादांच्या शिलेदरांची राजन पाटलांना वॉर्निंग

Viral Photo : विकी कौशल–कतरिनाच्या बाळाचा फोटो व्हायरल? चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण; खरं काय ते समोर आलं

Nagpur Bribe : नागपूर पोक्सो प्रकरणात महिला पोलिस तपास अधिकारीने साक्षीदाराला धमकावत मागितली लाच!

Yeola News : 'शिक्षक द्या शिक्षक!' हवालदार वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पालकांसह थेट पंचायत समिती गाठली

Latest Marathi Breaking News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढणार

SCROLL FOR NEXT