Aajache Panchang | Daily Panchang in Marathi sakal
अर्थविश्व

Today's Panchang 29 जुलै 2022: पांढरे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५८ ते दु.०३:४१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २९ जुलै २०२२ (daily panchang 29 july 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण ७ शके १९४४

आज सूर्योदय ०६:१३ वाजता तर सूर्यास्त १९:०७ वाजता होणार. चंद्रोदय ०६:२८ वा. तर प्रात: संध्याची वेळ स.०५:०६ ते स.०६:१३ दरम्यान असणार. सायं संध्या ही १९:०७ ते २०:१३ दरम्यान असणार तर अपहराण्हकाळ १३:५९ ते १६:३४ दरम्यान असणार. आज प्रदोषकाळ १९:०७ ते २१:१९ दरम्यान असणार तर निशीथ काळ २४:१८ ते २५:०२ दरम्यान असणार. आज राहु काळ ११:०४ ते १२:४१ दरम्यान आहे तर यमघंट काळ १५:५४ ते १७:३१ दरम्यान आहे. आज श्राद्धतिथी ही प्रतिपदा श्राद्ध आहे

सर्व कामांसाठी सायं.०७:१२ प.शुभ दिवस आहे.कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५८ ते दु.०३:४१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. विशेष म्हणजे या दिवशी कोहळा घेवू नये. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - ०७:५१ ते ०९:२८

  • अमृत मुहूर्त - ०९:२८ ते ११:०४

  • विजय मुहूर्त - १४:५३ ते १५:४२

    पृथ्वीवर अग्निवास २३:४३ प. आहे तर रवि मुखात आहुती आहे. शिववास स्मशानात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - श्रावण

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - प्रतिपदा(२३:४३ प.नं.द्वितीया)

  • वार - शुक्रवार

  • नक्षत्र - पुष्य(०९:२९ प.नं.आश्लेषा)

  • योग - सिद्धि(१९:१२ प.नं.व्यतिपात)

  • करण - किंस्तुघ्न(१०:५३ प.नं. बव)

  • चंद्र रास - कर्क

  • सूर्य रास - कर्क

  • गुरु रास - मीन

विशेष:- श्रावण मासारंभ, श्रावणात पालेभाज्या खावू नयेत, श्रावणात शंकर व विष्णूंना महिनाभर अभिषेक करणे, जिवतीपूजन, या दिवशी कुबेरास कापसाचे पोवते अर्पण करावे, इष्टि, चांद्र वर्षाऋतू प्रारंभ, उत्पात योग ०९:२९ प.

या दिवशी पाण्यात कापूर टाकून स्नान करावे. देवीकवच स्तोत्राचे पठण करावे. ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. देवीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.

दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ,मकर, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

|

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT