अर्थविश्व

"गुगल पे' सेवेचा डेटा भारतातच राहणार 

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : देशातील आघाडीची पेमेंट सुविधा देणाऱ्या "गुगल पे'ने आम्ही भारतीयांच्या पेमेंट सेवेशी निगडित माहिती भारतातच ठेवण्यासाठी व्यवस्था करू, असे म्हटले आहे. भारतीयांच्या पेमेंट सेवेशी संबंधित माहिती भारतातच ठेवण्याच्या नियमाची अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत. मात्र, ही प्रक्रिया विनाअडथळा आणि अत्यंत काळजीपूर्वक पार पडली पाहिजे, असे मत "गुगल पे'चे संचालक शरथ बुलुसू यांनी व्यक्त केले आहे. 

बुलुसू म्हणाले, ""आम्ही भारत सरकारच्या सर्व नियमांचे पालन करू. त्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही सेवा द्यायला सुरुवात केल्यानंतर सरकारच्या नियमावली आल्या आहेत. आमच्या 6.7 कोटी ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेत कोणताही व्यत्यय येणार नाही, याची काळजी घेत आम्ही ही प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. हे काम तांत्रिकदृष्ट्या सोपे नाही. मात्र, याबाबतीत रिझर्व्ह बॅंकेकडून (आरबीआय) चांगले सहकार्य मिळते आहे.'' 

आरबीआयने पेमेंट कंपन्यांना आर्थिक व्यवहारासंबंधित माहिती भारतातील सर्व्हरवर साठविण्याची सूचना केली आहे. सप्टेंबर 2019 अखेर गेल्या 12 महिन्यांच्या कालावधीत "गुगल पे'च्या माध्यमातून 110 अब्ज डॉलरचे व्यवहार पार पडले आहेत. तसेच, ग्राहकांची संख्या तिपटीने वाढून 6.7 कोटींवर पोचली आहे. देशातील आघाडीच्या सात शहरांमधील जवळपास दोनतृतीयांश व्यवहार "गुगल पे'च्या माध्यमातून पार पडत असल्याची माहिती बुलुसू यांनी दिली. 

याआधी व्हॉट्‌सऍपच्या बाबतीतही पेमेंट सेवेशी संबंधित माहिती भारतातच ठेवण्याचा विषय समोर आला होता. आरबीआयने 6 एप्रिलला काढलेल्या परिपत्रकात सर्व सेवा पुरवठादारांनी पेमेंट सेवेशी संबंधित माहिती केवळ भारतातीलच व्यवस्थेत जतन करता येईल, याची काळजी घ्यावी, असे म्हटले होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT