Share Market Sakal
अर्थविश्व

Share Market : बाजारात घसरण असूनही 'हा' शेअर देतोय धमाकेदार रिटर्न; वाचा काय आहे किंमत

शेअर बाजारात सध्या अतिशय अस्थिर वातावरण आहे.

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारात सध्या अतिशय अस्थिर वातावरण आहे. अशात सेन्सेक्स आणि निफ्टी गेल्या काही दिवसांपासून घसरणीसह बंद होत आहेत. पण अशातही मद्रास फर्टिलायझर्सच्या (Madras Fertilizers) शेअर्सनी 20% च्या तेजीसह एनएसईवर त्याच्या अपर सर्किटला स्पर्श केला.

कंपनीचा शेअर 73.65 रुपयांवर बंद झाला, जो गेल्या एका वर्षातील सर्वोच्च पातळी आहे. मद्रास फर्टिलायझर्सच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून येत आहे, त्यामुळे ही तेजी येत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

मद्रास फर्टिलायझर्स हा अशा शेअर्सपैकी एक आहे ज्याने यावर्षी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 153.09 टक्के वाढ झाली आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल 1,190 कोटी आहे आणि ते सध्या 5.05 च्या P/E रेश्योवर व्यवहार करत आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने 2022 च्या सुरुवातीला या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याची किंमत 2.53 लाख रुपये झाली असती.

मद्रास फर्टिलायझर्स (Madras Fertilizers) ही भारत सरकारच्या मालकीची कंपनी आहे, जी केमिकल आणि फर्टिलायझर्स मंत्रालयाच्या अंतर्गत येते. कंपनी युरिया आणि कॉम्प्लेक्स खतांच्या निर्मितीच्या व्यवसायात गुंतलेली आहे. याशिवाय ते बॉयो-फर्टिलायझर्सच्या निर्मिती आणि 'विजय' या ब्रँड नावाखाली पर्यावरणपूरक ऍग्रो-केमिकल, सेंद्रिय खते आणि सिटी कंपोस्टच्या व्यापारातही आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT