Narendra-Modi
Narendra-Modi 
अर्थविश्व

खनिज तेलातील महागाई विकासातील अडथळा - नरेंद्र मोदी

पीटीआय

नवी दिल्ली - खनिज तेलातील महागाई जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासात अडथळा ठरत असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केले. भारत आणि सौदी अरेबियामधील तेल कंपन्यांच्या प्रमुखांशी मोदी यांनी आज चर्चा केली. 

तेलपुरवठा आणि किमती या संदर्भातील धोरणाविषयी भारताशी संबंधित काही मुद्द्यांकडे मोदी यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘‘इंधनाची आयात करणारा भारत हा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे. इंधनाचे दर वाढले, की त्याचे परिणाम अनेक क्षेत्रांवर होतात. अर्थव्यवस्थेचा वेग मंदावतो. त्यामुळे तेल उत्पादक देशांकडून सहकार्याची आवश्‍यकता आहे.’’ 

तेल उत्पादक देशांकडून तेलाचे प्रमाण आणि त्याच्या किमती निश्‍चित केल्या जातात. तेलाच्या बाजारपेठेत तेलनिर्माते आणि तेलाचे ग्राहक यांच्यामध्ये भागीदारी निर्माण करण्याची आवश्‍यकता असल्याचा मुद्दा मोदी यांनी या बैठकीत उपस्थित केला. जागतिक बाजारपेठ मंदीतून सावरत असून, अर्थव्यवस्थेला स्थिरावण्यात इंधनाच्या किमती महत्त्वपूर्ण भूमिका बजातील, असे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान, निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, सौदी अरेबियाचे आणि संयुक्त अरब अमिरातीचे मंत्री आणि  तज्ज्ञ उपस्थित होते.

नव्याने गुंतवणूक का नाही?
मागील बैठकांमध्ये तेल आणि वायू क्षेत्राबाबत सुचविलेल्या अनेक सुधारणा सरकारने अमलात आणल्या आहेत, तरीही भारतात नव्याने गुंतवणूक का होत नाही, असा सवाल नरेंद्र मोदी यांनी बैठकीला उपस्थित विविध कंपन्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांना केला. तेल उत्पादक देशांनी आपली जादा गुंतवणूक उदयोन्मुख देशांतील तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात करावी, अशी अपेक्षाही मोदी यांनी या वेळी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: भाजप -एनडीए 2-0 ने आघाडीवर; कोल्हापुरात पीएम मोदांचा विरोधकांवर हल्लाबोल

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईला तगडा झटका! खलीलने आक्रमक खेळणाऱ्या सूर्यकुमारचा अडथळा केला दूर

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

SCROLL FOR NEXT