Reserve-bank
Reserve-bank 
अर्थविश्व

विकासाबाबत रिझर्व्ह बॅंकेला चिंता

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - जागतिक घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर चालू वर्षातील विकास- दराबाबत रिझर्व्ह बॅंकेने चिंता व्यक्त केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पतधोरण समितीच्या बैठकीतील इतिवृत्तात चीनसह प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या विकासदरातील घसरण चिंताजनक असल्याचे बॅंकेने म्हटले आहे. 

चलनवाढीने तळ गाठल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने गत पतधोरणात रेपो दर पाव टक्‍क्‍याने कमी केला होता. पतधोरणातील तटस्थ भूमिकेने धोरण लवचिक असून, शाश्‍वत विकासातील समस्या दूर करण्यात फायदेशीर ठरेल, असे मत रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्‍तिकांत दास यांनी व्यक्त केले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर खुंटला आहे. व्यापारी संघर्ष आणि ‘ब्रेक्‍झिट’चा तिढा यामुळे जागतिक विकासदरावर परिणाम होईल, असे दास यांनी म्हटले आहे.

कच्च्या तेलाच्या किमतींमधील घसरण दिलासादायक आहे. मात्र निर्यात वाढ जेमतेम झाल्याने त्यातील फायदा मर्यादित आहे. २०१९-२० या वर्षात विकासदर ७.४ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. पहिल्या सहामाहीत तो ७.२ टक्के ते ७.४ टक्‍के आणि तिसऱ्या तिमाहीत तो ७.५ टक्के राहील, असा अंदाज बॅंकेने व्यक्त केला आहे. नजीकच्या काळात पुरवठ्यात वाढ झाली, तर अन्नधान्यांच्या किमती कमीच राहतील आणि चलनवाढ नियंत्रणात राहील, असा विश्‍वास दास यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

Bhushan Pradhan: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय भूषण प्रधान? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

SCROLL FOR NEXT