Share-Market-Down
Share-Market-Down Sakal
अर्थविश्व

लाखाचे झाले बारा हजार, होत्याचं झालं नव्हतं; गुंतवणूकदार बुडालेत ? कोणती आहे ही कंपनी

सुमित बागुल

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange) ने DHFL या कंपनीची शेअर ट्रेडिंग बंद केलं आहे. याबाबतीत माहिती सविस्तर स्वरूपात जाहीर करण्यात आली आहे. या स्टॉक्सची क्लोजिंग प्राईस 11 जून निश्चित केली आहे. (DHFL to stop trading from Monday: Here is what you need to know)

इक्विटी शेअर्सची डिलिस्टिंग

डिएचएफएल DHFL ने 8 जून 2021 ला एक घोषणा केली होती. ज्यामध्ये एक्सेंजला एनसीएलटी (NCLT) च्या मुंबई बेंचकडून रिझॉल्युशन प्लानच्या अप्रुवल बाबत माहिती दिली गेली होती असं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. यात कंपनीच्या कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या डिलिस्टिंग बाबतीत माहिती दिली गेली आहे.

पिरामल ग्रुपची डिएचएफएल (DHFL) साठी बोली

डिएचएफएल (DHFL) साठी पिरॅमल ग्रुपने बोली लावली आहे, त्यात एनसीएलटी (NCLT) कडून जी स्कीम अप्रुव्ह केली आहे, त्यात डिएचएफएलच्या (DHFL) शेअर्ससाठी झिरो प्राईस निश्चत केली गेली आहे. तरीही ट्रेडिंग करण्याची परवानगी दिली गेली. बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) च्या सर्क्युलरनुसार डिएचएफएल (DHFL) ने 9 जून रोजी असं म्हटलं की, इंडिया इन्सॉल्विसी एँड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया (कॉर्पोरेट साठी दिवाळे समाधान प्रक्रिया) च्या अंतर्गत नियुक्त रजिस्टर्ड वॅल्युअर्सकडून अनुमानित कंपनीच्या लिक्विड वॅल्यूच्या आधारे इक्विटी शेअर्ससाठी कोणतही मूल्य ठरवलं गेलं नाही.

कागदोपत्री आदेश येणं अद्याप बाकी

कंपनीने पुढे असंही सांगितले की रिझॉल्यूशन प्लॅनच्या मान्यतेचा आदेश येणं बाकी आहे. जाहीर सर्व माहिती याच आदेशासोबत जोडली गेलेली आहे. डिएचएफएलच्या (DHFL) च्या शेअर्सवर या आठवड्याच्या सुरुवातीलाच ट्रेडिंग करायची परवानगी देण्यात आली होती. ज्यात 10 टक्के वाढ करण्याची परवानगीसुद्धा कंपनीला प्राप्त झाली होती. एकट्या एनएसई (NSE) वर 14 कोटी शेअर्सची ट्रेडिंग देखील झाली. गुंतवणूकदारांनी 8 जून ला 9 कोटी शेअर्सची डिलिव्हरी सुद्धा घेतली होती ज्याची क्लोजिंग किंमत 200 कोटी एवढी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 Live : मुंबईच्या गोलंदाजांनी केला टिच्चून मारा; लखनौचा निम्मा संघ गारद, सामन्यात रंगत

SCROLL FOR NEXT