When can Income Tax Refund not be received
When can Income Tax Refund not be received  sakal
अर्थविश्व

प्राप्तिकर परतावा कधी मिळू शकत नाही?

डॉ. दिलीप सातभाई dvsatbhaiandco@gmail.com

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की १० नोव्हेंबर २०२२ पर्यंतचे प्रत्यक्ष करसंकलन १०.५४ लाख कोटी रुपये झाले

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की १० नोव्हेंबर २०२२ पर्यंतचे प्रत्यक्ष करसंकलन १०.५४ लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील एकूण संकलनापेक्षा हे प्रमाण ३०.६९ टक्के अधिक आहे. एकूण कॉर्पोरेट कर आणि वैयक्तिक प्राप्तिकर संकलनात अनुक्रमे २२.०३ टक्के आणि ४०.६४ टक्के वाढ झाली आहे.

या उत्पन्नातून एक एप्रिल ते १० नोव्हेंबर २०२२ दरम्यान, १.८३ लाख कोटी रुपयांचा परतावा अर्थात रिफंड परत करण्यात आला आहे. तथापि, आजही असे काही करदाते आहेत, ज्यांना अद्याप त्यांच्या प्राप्तिकराचा परतावा मिळालेला नाही. प्राप्तिकर परतावा मिळण्यात विलंब होण्यामागे विविध कारणे असू शकतात.

ती कारणे काय असू शकतात, याची माहिती घेऊन योग्य उपाययोजना केली, तर करदात्यास विनासायास परतावा मिळू शकतो. काही करदात्यांना प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्याच्या काही मिनिटांत परतावा रक्कमा मिळाल्याचा सुखद अनुभव आला आहे.

१. परताव्याची प्रक्रिया

प्राप्तिकर परतावा मिळण्यास विलंब झाला असेल, तर करदात्यांना त्यांच्या परताव्याची करविभागाकडून प्रक्रिया झाली आहे की नाही, हे प्रथम तपासावे लागेल. जेव्हा त्यांच्या विवरणपत्रावर प्रक्रिया केली जाते आणि कर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर पुष्टी केली जाते; तेव्हाच त्यांना रिफंड मिळू शकतो. प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत पोर्टलवर याबाबतची माहिती तपासली जाऊ शकते व त्याबरहुकूम प्रक्रिया केल्यास परताव्याची रक्कम मिळू शकते.

२. बँक खाते पडताळणी

बँक खाते पडताळणी हे देखील परताव्यात विलंब होण्याचे आणखी एक कारण असू शकते. करदाते बँक खात्याची पडताळणी करताना त्रुटी तपासू शकतात आणि ई-फायलिंग पोर्टलवर लॉग-इन करून बँक खाते आपल्या ‘पॅन’शी संबंधित आहे का, ते तपासू शकतात. कधी कधी प्राप्तिकर विभागास असे समजते, की करदात्याचे नाव व भागीदारी फर्मचे नाव सारखेच आहे. अशावेळी, एकच बँक खाते क्रमांक दिला असल्यास पुन्हा पडताळणी केली जाते व ही बाब निदर्शनास आल्यास परतावा खात्यात जमा केला जात नाही. याखेरीज करदात्यांचे बँक खाते बंद झाले असल्यास वा अशा खात्यावर कायदेशीर मार्गाने टाच आली असल्यास व त्या खात्यात व्यवहार करण्यास बंदी आली असल्यास, त्या खात्यात परताव्याची रक्कम जमा होऊ शकत नाही.

३. प्राप्तिकराची थकबाकी

विविध कारणास्तव करदात्याची प्राप्तिकराची थकबाकी संभवते. त्यातील प्रमुख कारण म्हणजे दंड व दंडावरील व्याज न भरणे हे होय. याखेरीज गेल्या वर्षीपासून विवरणपत्र भरताना स्वयं निर्धारण प्राप्तिकर अगोदर भरण्याची अट शिथिल करण्यात आल्याने आता स्वयं निर्धारण प्राप्तिकर देय तारखेच्या नंतरही बँकेत भरता येतो. त्यामुळे थकबाकी संभावते. याखेरीज मागील आर्थिक वर्षापासून करदात्यांची प्राप्तिकर थकबाकी असलेली मागणी प्रलंबित असल्यास परताव्यासही विलंब होऊ शकतो. तथापि, अशा प्रकरणांमध्ये प्राप्तिकर विभाग त्या मागणीच्या तुलनेत परताव्याची रक्कम वळती करून, ती रक्कम तशी वळती करून घेतली आहे, अशी नोटीस कलम २४५ अंतर्गत पाठवून देतात. ज्यावेळी अशी नोटीस येईल, त्यावेळी परतावा मिळणार नाही किंवा कमी मिळेल, हे लक्षात घेतले पाहिजे.

४. परताव्याची रक्कम १०० रुपयांपेक्षा कमी

परताव्याची रक्कम १०० रुपयांपेक्षा कमी असेल, तर प्राप्तिकर विभाग ती तुमच्या बँक खात्यात जमा करत नाही. अशा प्रकरणांमध्ये भविष्यातील प्राप्तिकर परताव्यामध्ये ती रक्कम समायोजित केली जाते. परतावा मिळण्यात विलंब होण्याचे हे एक कारण असू शकते.

५. परतावा रि-इश्यू करण्याची विनंती

प्राप्तिकर विभागाने स्टेट बँकेमार्फत चेकने दिलेली परस्पर खात्यात जमा होणारी परताव्याची रक्कम विविध कारणास्तव करदात्याच्या बँक खात्यात चेक जमा न झाल्यास पुन्हा स्टेट बँकेत प्राप्तिकर विभागामार्फत जमा होते. अशावेळी

परतावा पुन्हा जारी करण्याची विनंती न केल्यास कर विभागामार्फत तो चेक पुन्हा खात्यात जमा करण्यासंदर्भात स्टेट बँकेला आदेश दिला जात नाही व असे न केल्यास परताव्याची रक्कम बँकेकडे पडून राहते व पर्यायाने ती करदात्यास मिळत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

'चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमधून श्रीलंकेत हलवणार…?' दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर नेटकऱ्यांनी घेतली मजा

The Patna-Kota Express Train: स्टेशन मास्तरला झोप लागली अन्.. अर्धा तास हॉर्न वाजवत राहिला ट्रेनचालक

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Kangana Ranaut : ''निवडणूक जिंकले तर बॉलीवूड सोडणार'', कंगना रणौतने जाहीर केली भूमिका

SCROLL FOR NEXT