The Patna-Kota Express Train: स्टेशन मास्तरला झोप लागली अन्.. अर्धा तास हॉर्न वाजवत राहिला ट्रेनचालक

The Patna-Kota Express Train : इटावाजवळील उदी मोर रोड स्टेशनवर शुक्रवारी स्टेशन मास्टर झोपल्यामुळे पाटणा-कोटा एक्सप्रेस गाडी सुमारे अर्धा तास ग्रीन सिग्नलची वाट पाहत उभी राहिली.
The Patna-Kota Express Train
The Patna-Kota Express Trainesakal

The Patna-Kota Express Train Delay : प्लॅटफॉर्मवर ट्रेन उशिरा आल्याच तुम्ही कधी ना कधी ऐकलंच असेल. पण ग्रीन सिग्नल न मिळाल्याने ट्रेन थांबून राहिल्याची घटना उत्तरप्रदेश मधील इटावा स्टेशनवर घडली आहे.

शुक्रवारी इटावाजवळील उदी मोर रोड स्टेशनवर स्टेशन मास्तर झोपल्यामुळे पटणा-कोटा एक्सप्रेस (patna-kota train delay) गाडी सुमारे अर्धा तास ग्रीन सिग्नलची वाट पाहत उभी राहिली. (Itava Train delay) या घटनेची गांभीर्यपूर्वक दखल घेत आग्रा विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी (डीआरएम) चूक करणाऱ्या स्टेशन मास्तराकडे याबाबत स्पष्टीकरण मागवले आहे.

The Patna-Kota Express Train
Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

स्टेशन मास्तराच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या या विलंबामुळे ट्रेन फेऱ्यांच्या वेळापत्रकात बिघाड झाला असून, परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यताही निर्माण झाली होती. आग्रा विभागीय रेल्वे जनसंपर्क अधिकारी (PRO) प्रियाशी श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, "स्टेशन मास्तरवर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्याच्यावर कारवाई केली जाईल."

उदी मोर रोड हे इटावा (Itava station) जवळील छोटे परंतु महत्वाचे स्थानक आहे. या स्थानकावरून आग्रा ते प्रयागराज आणि झाशीकडे जाणाऱ्या गाड्यांची ये-जा असते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीच्या चालकांना (loco pilot) स्टेशन मास्तराला जागृत करण्यासाठी आणि पुढे जायला हिरवा सिग्नल (green signal late) मिळवण्यासाठी अनेक वेळा हॉर्न वाजवावे लागले.

स्टेशन मास्तरांनी आपली चूक कबूल केली असून त्यांनी या चुकीबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे. त्यांच्यासोबत असलेले पॉइंट्समन (pointsman ) वेगवेगळ्या ट्रॅकवर गाडी वळवण्यासाठी मदत करणारा कर्मचारी ट्रॅक तपासणीसाठी गेले असल्यामुळे ते स्टेशनवर एकटे होते,” त्यामुळे असा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले.

DRM तेज प्रकाश अग्रवाल यांनी वेळापत्रक (train timetable collapse) सुधारणेवर भर देत या घटनेची त्यांनी गांभीर्यपूर्वक दखल घेतली आहे. ते कर्मचाऱ्यांना वेळापत्रक सुधारण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. त्यामुळे ९० टक्के वेळापत्रक निश्चित वेळेनुसार रिकव्हर करण्यात यश आले आहे.

The Patna-Kota Express Train
Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com