RBI sakal
अर्थविश्व

निधीच्या व्यवस्थापनास शिस्त लावा; रिझर्व बँकेचा राज्य सरकारांना सल्ला

देशातील विविध राज्य सरकारांच्या वित्त सचिवांची ३२ वी बैठक आज येथे झाली, त्यावेळी गव्हर्नर बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

देशातील विविध राज्य सरकारांच्या वित्त सचिवांची ३२ वी बैठक आज येथे झाली, त्यावेळी गव्हर्नर बोलत होते.

मुंबई - राज्य सरकारांनी आपल्या निधीचे चे व्यवस्थापन तसेच कर्जे, खर्च आणि सहकारी बँकांचे व्यवस्थापन यांच्यात सुधारणा करावी, असा सल्ला रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी आज येथे दिला.

देशातील विविध राज्य सरकारांच्या वित्त सचिवांची ३२ वी बैठक आज येथे झाली, त्यावेळी गव्हर्नर बोलत होते. या बैठकीला केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे अधिकारी, कंट्रोलर जनरल आदी वरिष्ठ अधिकारी हजर होते.

सध्याची एकंदर आर्थिक परिस्थिती पाहता राज्य सरकारने कर्ज घेण्याबाबत तसेच आपल्या निधीचे व्यवस्थापन करण्याबाबत काळजी घ्यावी, असेही त्यांनी सुचवले. राज्य सरकारांनी आपल्या खर्चाला शिस्त लावावी तसेच अचानक येणाऱ्या खर्चांचे योग्य व्यवस्थापन करावे, असेही ते म्हणाले. विविध राज्य सरकारांनी बाजारातून कर्ज घेण्याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली. राज्य सरकारांचा खर्च तसेच चलनवाढ नियंत्रणात आणण्यातील राज्य सरकारची भूमिका, राज्य सरकारांची कर्ज विषयक धोरणे आणि अन्य मुद्द्यांबाबत या बैठकीत चर्चा झाली. ही माहिती रिझर्व बँकेच्या पत्रकात देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT