Disclosure of Reserve Bank of India Bulletin Author views on anti-privatization  esakal
अर्थविश्व

भारतीय रिझर्व्ह बँकेचा बुलेटिनबाबत खुलासा; खासगीकरणाविरोधी मते लेखकाची

रिझर्व्ह बँकेच्या ऑगस्ट महिन्याच्या बुलेटिनमध्ये सरकारी बँकांच्या खासगीकरणाविरोधात एक लेख प्रसिद्ध झाला होता

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या ऑगस्ट महिन्याच्या बुलेटिनमधील एका लेखात व्यक्त केलेली सरकारी बँकांच्या खासगीकरणाविरोधातील मते ही रिझर्व्ह बँकेची नसून संबंधित मजकूर लिहिणाऱ्या लेखकांची आहेत, असे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेने दिले आहे. रिझर्व्ह बँकेच्या ऑगस्ट महिन्याच्या बुलेटिनमध्ये सरकारी बँकांच्या खासगीकरणाविरोधात एक लेख प्रसिद्ध झाला होता. सरकारी बँकांच्या खासगीकरणामुळे फायद्यापेक्षा तोटा जास्त होईल, असे त्यात म्हटले होते.

त्यानंतर रिझर्व्ह बँक ही सरकारी बँकांच्या खासगीकरणाविरोधात आहे, अशी वृत्ते काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने हा खुलासा केला आहे. तो लेख रिझर्व्ह बँकेच्या डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी रिसर्च विभागाच्या दोन अभ्यासकांनी लिहिला होता. त्या लेखकांनी सरकारी बँकांच्या खासगीकरणाचे फायदे व तोटे तपासून त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल ते लिहिले आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT