Mutual Funds Sakal
अर्थविश्व

स्मार्ट टिप्स : इक्विटी म्युच्युअल फंड कधी विकावा?

इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी, याविषयी नेहमी मार्गदर्शन केले जाते. मात्र, गुंतवणूक केलेल्या फंडाची विक्री कधी करावी, याविषयी फारसे मार्गदर्शन केले जात नाही.

-डॉ. वीरेंद्र ताटके

इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी, याविषयी नेहमी मार्गदर्शन केले जाते. मात्र, गुंतवणूक केलेल्या फंडाची विक्री कधी करावी, याविषयी फारसे मार्गदर्शन केले जात नाही. याविषयी काही गुंतवणूकदारांच्या मनात संभ्रम असतो. त्यामुळे गुंतवणुकीवर थोडा फायदा दिसला तर ती गुंतवणूक विकून आपले पैसे मोकळे करून घेण्याकडे अशा गुंतवणूकदारांचा कल दिसतो. असे केल्याने शेअर बाजारातील भविष्यातील तेजीला असे गुंतवणूकदार मुकतात. काही गुंतवणूकदार अशा विक्रीतून जमा झालेले पैसे पुन्हा त्याच म्युच्युअल फंडात चढ्या भावाला गुंतवतात आणि अप्रत्यक्षपणे स्वतःचा तोटा करून घेतात. त्यामुळे इक्विटी म्युच्युअल फंडाची गुंतवणूक करताना विक्रीची देखील व्यूहरचना तयार करावी. त्यादृष्टीने पुढील मुद्दे लक्षात ठेवावेत-

गुंतवणुकीचा कालावधी व आर्थिक उद्दिष्ट ठरविणे

इक्विटी म्युच्युअल फंड हे दीर्घकालीन गुंतवणुकीचे साधन असल्यामुळे आपल्या गुंतवणुकीचा दीर्घ कालावधी ठरवून घ्यावा. हा कालावधी नक्की किती असावा, याचे ठोस उत्तर नसले तरी कमीतकमी पाच ते सात वर्षांपूर्वी गुंतवणूक विकू नये. गुंतवणूक सुरू करतानाच, कालावधीसोबत आपले आर्थिक उद्दिष्टदेखील ठरवून घ्यावे. उदाहरणार्थ, अशा गुंतवणुकीतून पाच वर्षांत १५ लाख रुपये मिळावेत असे उद्दिष्ट ठेवून आपण गुंतवणूक सुरु केली असेल, तर ते उद्दिष्ट साध्य होईपर्यंत विक्रीचा विचार करू नये.

कामगिरीचा आढावा घ्या

आपण ठरविलेल्या कालावधीदरम्यान प्रत्येक वर्षी गुंतवणूक सुरु असलेल्या फंडाच्या कामगिरीचा आढावा घ्या. एखादा फंड सलग दोन-तीन वर्षे खराब कामगिरी करीत असेल आणि इतर फंड मात्र चांगली कामगिरी करीत असतील, तर खराब कामगिरी करणाऱ्या फंडाची विक्री करावी. अर्थात असे करताना इतर बाबींचा देखील विचार करावा.  उदाहरणार्थ, बँकिंग क्षेत्रातील सर्वच फंड चांगले कामगिरी करीत असताना, आपला बँकिंग फंड वाईट कामगिरी करीत असेल, तर त्याची विक्री करावी. मात्र, संपूर्ण बँकिंग क्षेत्रच खडतर मार्गातून जात असेल, तर आपल्या फंडाच्या कामगिरीचे मूल्यमापन करून घाईघाईने निर्णय न घेता थोडा अधिक कालावधी द्यावा.

चांगले फंड विकू नका

आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर देखील पैशांची गरज नसेल तर अशा फंडाची विक्री करू नये. अशा फंडातील गुंतवणुकीवर भविष्यात देखील चांगला फायदा मिळू शकतो. दीर्घकाळात संपत्ती तयार करायची असेल तर चांगले म्युच्युअल फंड आपल्या पोर्टफोलिओमध्ये कायम असले पाहिजेत. एखादी छोटीशी आर्थिक निकड भागविण्यासाठी असे चांगले फंड विकून आपण आपले नुकसान करून घेऊ नये.

प्राप्तिकराचा बोजा लक्षात घ्या

इक्विटी फंडातील गुंतवणुकीची विक्री करून होणाऱ्या नफ्यावर प्राप्तिकर आकारला जातो, हे कायम लक्षात ठेवावे. सध्याच्या नियमानुसार अशा फंडातील गुंतवणूक कालावधी एक वर्षापेक्षा कमी असेल तर होणाऱ्या नफ्यावर १५ टक्के अल्पकालीन भांडवली लाभ कर लागू होतो. गुंतवणुकीचा कालावधी जर एक वर्षापेक्षा अधिक असेल तर एक लाख रुपये नफ्यापर्यंत काहीही कर लागू होत नाही. मात्र, त्यावरील नफ्यावर १० टक्के दीर्घकालीन भांडवली लाभ कर लागू होतो. असा प्राप्तिकर भरणे ही गुंतवणूकदाराची जबाबदारी असल्यामुळे गुंतवणूक आणि करसल्लागाराकडून त्याची पूर्ण माहिती घ्यावी.

(लेखक म्युच्युअल फंडाचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT