dr.virendra tatke write about Banking fund
dr.virendra tatke write about Banking fund  
अर्थविश्व

एकतरी बॅंकिंग फंड अनुभवावा!

डॉ. वीरेंद्र ताटके

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या लाडक्‍या शेअरची यादी काढली, तर त्या यादीत अनेक बॅंकांचे शेअर अग्रभागी येतील. त्याचे कारणही तसेच आहे. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत बॅंका महत्त्वाची भूमिका बजावतात. उद्योग- व्यवसायांच्या भरभराटीसाठी आवश्‍यक असलेले स्थिर भांडवल, खेळते भांडवल आणि सामान्य लोकांच्या सर्व कर्जांच्या गरजा भागविणाऱ्या बॅंकांचे महत्त्व भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत खूप आहे. यामुळेच उत्तम बॅंकांचे शेअर आपल्याकडे असावेत, असे प्रत्येकाला वाटणे साहजिक आहे. वेगाने व्यवसाय वाढणाऱ्या बॅंकेचा शेअर किती फायदा मिळवून देऊ शकतो, याचे उदाहरण पाहायचे असल्यास येस बॅंकेच्या शेअरकडे पाहता येईल.

एप्रिल 2016 ते मार्च 2017 या एका वर्षात या शेअरने जवळजवळ 100 टक्के परतावा दिलेला आहे. अशा वेगवेगळ्या बॅंकांच्या शेअरमध्ये एकत्रित गुंतवणूक करण्यासाठी बॅंकिंग म्युच्युअल फंड अतिशय योग्य ठरतात. उदाहरणार्थ, रिलायन्स बॅंकिंग फंड. या फंडात गुंतवणूक केल्यास एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, स्टेट बॅंक, येस बॅंक, फेडरल बॅंक यांसारख्या बॅंकांच्या शेअरमध्ये एकत्रित गुंतवणूक केल्याचे फायदे मिळतीलच; शिवाय रिलायन्स कॅपिटल, मुथ्थुट फायनान्स यांसारख्या आर्थिक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमधील गुंतवणुकीचादेखील फायदा मिळेल. वर्ष 2003 मध्ये मे महिन्यात बाजारात आलेल्या या फंडाने गेल्या चौदा वर्षांमध्ये सरासरी 25 टक्के करमुक्त वार्षिक परतावा दिलेला आहे. अर्थातच हा परतावा त्या फंडात समाविष्ट असलेल्या बॅंकांच्या उत्तम कामगिरीचा परिपाक आहे.

असे असेल तर बॅंकिंग फंडात गुंतवणूक करण्याऐवजी काही बॅंकांचे शेअरच खरेदी का करू नयेत, असे काही गुंतवणूकदारांना वाटू शकेल. मात्र, अशा गुंतवणूकदारांनी आपण त्या अभ्यासासाठी तेवढा वेळ देऊ शकतो का, शिवाय आपला अभ्यास दुर्दैवाने चुकला तर तेवढी जोखीम घेऊ शकतो का आणि एकावेळी अनेक बॅंकांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याएवढे भांडवल आणू शकतो का, हे प्रश्न स्वतःला विचारावेत. शिवाय, थकीत कर्जांचे वाढते प्रमाण (एनपीए), घसरते व्याजदर, बॅंकांमधील तीव्र स्पर्धा यांचा बॅंकांच्या नफ्यावर परिणाम होत असल्याने सर्वच बॅंकांचे शेअर सदासर्वकाळ तेजीतच राहतील, अशी खात्री कोणीही देऊ शकत नाही. हीच जोखीम बॅंकिंग फंडासारख्या सेक्‍टोरल फंडातील गुंतवणुकीतदेखील असते. ही जोखीम लक्षात घेऊनच अशा फंडातील आपली गुंतवणूक मर्यादित ठेवून "एसआयपी'च्या मार्गाने प्रत्येक गुंतवणूकदाराने एकतरी बॅंकिंग फंड दीर्घकाळासाठी अनुभवावा, असे वाटते.

गेल्या पाच वर्षांत उत्तम कामगिरी केलेले काही बॅंकिंग फंड पुढीलप्रमाणे आहेत - आयसीआयसीआय प्रूडेन्शिअल बॅंकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड, रिलायन्स बॅंकिंग फंड, यूटीआय बॅंकिंग सेक्‍टर फंड, सुंदरम फायनान्शियल सर्व्हिसेस अपॉर्च्युनिटीज फंड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT