D-Street Talk Sakal
अर्थविश्व

D-Street Talk : येत्या काळात Artificial Intelligence चे वर्चस्व, या 6 कंपन्यांवर लक्ष असू द्या...

Artificial Intelligence कंप्यूटर सायन्सची एक शाखा आहे जी इंटेलिजेंट मशीन बनवायचे काम करते. या मशीन्स माणसांसारखा विचारही करतील ही त्यातली महत्त्वाची बाब आहे.

सुमित बागुल

कोव्हिडनंतर Artificial Intelligence आपल्यासाठी महत्त्वाची गरज बनते आहे. त्यामुळेच मोठमोठ्या कंपन्या Artificial Intelligence (AI) आणि मशीन लर्निंगवर आधारित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपले उत्पादन वाढवण्यासोबत नवे प्रोडक्ट्स बनवताना दिसून येत आहेत.

Artificial Intelligence म्हणजे नेमके काय ?

Artificial Intelligence कंप्यूटर सायन्सची एक शाखा आहे जी इंटेलिजेंट मशीन बनवायचे काम करते. या मशीन्स माणसांसारखा विचारही करतील ही त्यातली महत्त्वाची बाब आहे. जसे की speech recognition, problem-solving, learning आणि planning सारखी कामे करतील. Complete Circle Consultants Pvt Ltd च्या क्षितिज महाजन यांनी ही माहिती दिली. पण त्यांनी सांगितलेल्या कंपन्यांची आम्ही शिफारस करत नाही आहोत, केवळ तुमच्या माहितीसाठी या कंपन्यांची आणि त्यांच्या शेअर्सची माहिती देत आहोत.

Bosch

2025 पर्यंत बॉसच्या सगळ्या प्रॉडक्ट्समध्ये AI चा वापर होईल. Bosch Indego S+ याचे उत्तम उदाहरण आहे. हा एक रोबोटिक लॉन मूव्हर आहे. ज्याला अॅमेझॉन एलेक्साच्या माध्यमातून व्हॉइस कंट्रोलने चालवता येते. अशीच Bosch SoundSee एक सेन्सर सिस्टीम आहे, ज्यात AI आधारित ऑडियो ऍनालिटिक्सचा वापर केला जातो.

Happiest Minds

Happiest Minds टेक लिमिटेड टेक्नोलॉजी प्रोवायडर्स आणि सगळ्या कंपन्यांना डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सुविधा देते. Happiest Minds च्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये AI चे ब्लॉक चेन, cloud, digital process automation, internet of things, robotics/drones, security, virtual/augmented reality सारख्या तंत्रज्ञानाचा वापर होतो.

Cyient

Cyient ही कंपनी डिजिटल मॅप डेव्हलपर्सना सेवा देते. ही कंपनी स्वयंचलित गाड्यांना सुरक्षित संचालनासाठी मदत करते.

Affle India

Affle एक ग्लोबल टेक्नोलॉजी कंपनी आहे. Affle आपल्या व्यवसायात AI चा सर्वसमावेशक वापर करते.

Zensar Technologies

या कंपनीचाही AI वर मोठा विश्वास आहे. AI आता नेमकी त्याच ठिकाणी जिथे काही काळापुर्वी डिजिटल टेक्नोलॉजी होती. Zensar Technologies ही AI वर लक्ष केंद्रीत करतेय. मागच्या 2 वर्षात कंपनीने 100 पेटंट्स स्वतःच्या नावे केलेत.

Saksoft

Saksoft आपल्या क्लायंट्सना Intelligent Automation, Legacy Modernisation, Managed Infrastructure support, Advanced Analytics, Quality Assurance, सारख्या बऱ्याच सेवा देते आहे ज्या AI वर आधारित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT