अर्थविश्व

प्राप्तिकराच्या आकडेमोडीसाठी ई-कॅल्क्‍युलेटर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने करदात्यांसाठी ई-कॅल्क्‍युलेटर लाँच केला आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्या प्राप्तिकर प्रणालीची घोषणा केली होती. यापुढे करदात्यांना जुनी किंवा नवी प्राप्तिकर प्रणाली प्राप्तिकर विवरणपत्र भरताना निवडता येणार आहे. त्यासाठी नव्या करप्रणालीनुसार किती प्राप्तिकर जमा करायचा, याची आकडेमोड नागरिकांना करता येणार आहे. अर्थात, जे करदाते नवी प्राप्तिकर रचना स्वीकारणार आहेत, त्यांना प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करताना कर वजावट आणि सूट यांचा लाभ घेता येणार नाही. 

प्राप्तिकर विभागाने लाँच केलेले ई-कॅल्क्‍युलेटर जुन्या आणि नवीन करप्रणालीची २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी तुलना करण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देते. हे ई-कॅल्क्‍युलेटर प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंगच्या वेबसाइटवर म्हणजेच incometaxindiaefiling.gov.in वर उपलब्ध आहे. हे संकेतस्थळ इलेक्‍ट्रॉनिक प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी वैयक्तिक करदात्यांकडून आणि इतर श्रेणीतील करदात्यांकडून वापरले जाते. प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर रिटर्न्स) दाखल करणाऱ्यांची विभागणी तीन वयोगटांत केली जाते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT