MHADA Demolition in Mumbai
esakal
मुंबईतील अँटॉप हिल परिसरातील बंगालीपुरा येथे अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या पक्ष कार्यालयांवरही म्हाडाने हातोडा चालवला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. अतिक्रमण हटवण्याला आमचा विरोध नाही. मात्र, कारवाई करण्यापूर्वी पुरेसा वेळ द्यायला हवा होता. तसेच सर्वांवर समान पद्धतीने कारवाई व्हायला हवी होती, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.