E-Shram Card sakal
अर्थविश्व

E-Shram Card : 'या' 5 राज्यांची ई-श्रम पोर्टलवर आहे सर्वाधिक नोंदणी; तर महाराष्ट्र...

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 47.02 टक्के पुरुष आणि 52.98 टक्के महिलांनी नोंदणी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

देशातील असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांना एकत्र आणण्यासाठी ई-श्रम कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार मजूर आणि कामगारांना आर्थिक मदत करते. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने विकसित केलेल्या ई-श्रम पोर्टलवर आतापर्यंत 28.42 कोटी लोकांची नोंदणी झाली आहे.

हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

आर्थिक मदतीव्यतिरिक्त, या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 2 लाख रुपयांच्या अपघात विम्याचा लाभ दिला जातो. देशातील सर्व मजूर जसे की फेरीवाले, भाजी विक्रेते, घरगुती कामगार तसेच अल्पकाळ काम करणारे तरुण ई-श्रम कार्ड योजनेचा लाभ घेऊ शकतात. दुसरीकडे, जर कोणी कर भरत असेल किंवा व्यावसायिक असेल तर त्याला याचा लाभ दिला जाणार नाही.

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशातील कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर सर्वाधिक नोंदणी केली आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर, बिहार तिसऱ्या क्रमांकावर, चौथ्या क्रमांकावर ओडिशा आणि पाचव्या क्रमांकावर झारखंड आहे. याशिवाय आतापर्यंत 47.02 टक्के पुरुष आणि 52.98 टक्के महिलांनी नोंदणी केली आहे.

ई-श्रम कार्डसाठी नोंदणी कशी करावी ?

आतापर्यंत सुमारे 28.50 कोटी लोकांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक 8.2 कोटी नोंदणी यूपीमधून झाली आहे. तुम्ही पोर्टलवर स्वत:ची नोंदणी करू शकता. सर्व प्रथम ई-श्रम पोर्टलवर जा आणि नंतर ई-श्रम वर नोंदणी पर्यायावर क्लिक करा.

आता तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि OTP आल्यावर तो भरावा लागेल. यानंतर ई-लेबर फॉर्म भरा आणि सबमिट करा. एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुमची नोंदणी पूर्ण होईल आणि तुम्ही काही दिवसांत तो डाउनलोड करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT