E-Shram Card  sakal
अर्थविश्व

E-Shram Card : सरकारची ई-श्रम कार्ड योजना काय आहे? त्याचे फायदे काय आहेत? जाणून घ्या

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने ही योजना बनवली आहे.

सकाळ डिजिटल टीम

देशातील असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांना एकत्र आणण्यासाठी ई-श्रम कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार मजूर आणि कामगारांना आर्थिक मदत करते. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने विकसित केलेल्या ई-श्रम पोर्टलवर आतापर्यंत 28.42 कोटी लोकांची नोंदणी झाली आहे.

आर्थिक मदतीव्यतिरिक्त, या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 2 लाख रुपयांच्या अपघात विम्याचा लाभ दिला जातो. देशातील सर्व मजूर जसे की फेरीवाले, भाजी विक्रेते, घरगुती कामगार तसेच अल्पकाळ काम करणारे तरुण ई-श्रम कार्ड योजनेचा लाभ घेऊ शकतात. दुसरीकडे, जर कोणी कर भरत असेल किंवा व्यावसायिक असेल तर त्याला याचा लाभ दिला जाणार नाही.

हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

ई-श्रम कार्डचे फायदे काय आहेत?

ई-लेबर पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर काही दिवसांनी मजूर आणि कामगारांचे कार्ड बनवले जाते. या पोर्टल अंतर्गत देशातील सर्व मजुरांना एका व्यासपीठावर जोडले जात आहे. या कारणास्तव, केंद्र सरकारने भविष्यात कोणतीही योजना सुरू केल्यास या पोर्टलच्या मदतीने नोंदणीकृत कामगार आणि मजुरांना त्याचा लाभ दिला जाईल.

त्यावर नोंदणी करणाऱ्यांना सध्या दोन लाख रुपयांचा अपघात विमा दिला जात आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत असंघटित क्षेत्रातील कामगारांना 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण दिले जाते. समजा अपघातात कामगाराला जीव गमवावा लागला तर 2 लाख रुपये दिले जातात . कामगार अंशतः अपंग असल्यास त्याला एक लाख रुपयांची मदत मिळते.

असंघटीत कामगार :

देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात. बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारी कामगारांसह, भूमिहीन शेतमजूर व इतर काही असंघटित कामगारांची नोंदणी या संकेतस्थळावर करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT