e-Shram Google
अर्थविश्व

E-shram : सरकार देतेय ३००० रुपये, तुम्हीही घ्या लाभ, लगेच करा 'हे' काम

सकाळ डिजिटल टीम

देशातील गरजवंत लोकांना फायदा मिळावा या हेतूने सरकार कित्येक प्रकाराचे कामे करते. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघेही यासाठी कित्येक योजना आखतात किंवा जुन्या योजनांचा विकास करतात. सध्याच्या काळामध्ये देशामध्ये शिक्षण, रोजगार, आरोग्य, रेशन, आर्थिक मदत देणे अशा कित्येक योजना सुरु आहेत. यापैकी कित्येक योजना भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाद्वारे चालविल्या जात आहेत. जसे की, ई-श्रम कार्ड. या कार्डमध्ये कामगार मंत्रालयाद्वारे ऑयकॉनिक वीकची सुरूवात करण्यात आली आहे. जर तुम्ही हा विचार करत असेल की हे नक्की काय आहे. याचे फायदे काय? आणि याचा लाभ कोण-कोण घेऊ शकतो? चला, तुम्हाला या आयकॉनिक वीकबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

सरकाने केले जाहीर

भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाद्वारा आयकॉनिक वीकची सुरूवात झाली आहे. याअंतर्गत एक स्कीम'डोनेट ए पेंशन' सुरुर केली आहे. याची सुरूवात केंद्रीय मंत्री भूंपेंद्र यादव यांनी दिल्लीमध्ये केली. यामध्ये असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणारे कामगरांसाठी ई-श्रम रजिस्ट्रेशन सुरूवात होते.

काय आहेत फायदे?

या आयकॉनिक वीकबाबतच्या फायद्यांबाबत बोलायचे झाले तर १८ ते ४० वर्षच्या वयातील लोक जे असंघटीत क्षेत्रातील काम करत आहेत. साधारण ६६०पासून २४०० रुपयांपर्यंत जमा करू शकतो, त्यांच्या वयाच्या हिशोबाने ६० वर्षानंतर ३ हजार रुपये पेन्शन मिळते.

कोण आहे पात्र?

  • अशी व्यक्ती ज्यांचे वय १८-४० वर्षांमध्ये असले पाहिजे.

  • जे लोक असंघटी क्षेत्रामध्ये काम करतात

किती प्रीमियम? किती पेन्शन?

सोप्या शब्दामध्ये सांगायचे झाले तर, किती प्रीमियमच्या बदलानुसार किती पेंशन मिळेल. सरकारच्या माहितीनुसार, जर कोणताही कामगार ६६० रुपयांपासून २४०० रुपयांपर्यंत जमा करत असेल तर, त्याच्या वयानुसार ६० वर्षानंतर ३ हजार रुपये पेन्शन मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : सरकारने लोकांची गैरसोय करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला- आशुतोष रांका

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT