SEBI  sakal
अर्थविश्व

Financial Influencers : सोशल मीडियावर शेअर बाजाराच्या टिप्स देणाऱ्यांवर सेबीची कारवाई; कारण...

आजकाल अनेक लोक सोशल मीडियाद्वारे लोकांना आर्थिक सल्ला देण्याचे काम करतात.

सकाळ डिजिटल टीम

लोकांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडिया हे सर्वात मोठे माध्यम बनले आहे. आजकाल अनेक लोक सोशल मीडियाद्वारे लोकांना आर्थिक सल्ला देण्याचे काम करतात. अनेक वेळा या सूचनांना बळी पडून गुंतवणूकदार त्यांच्या कष्टाचे पैसे गमावतात. पण शेअर बाजाराचे नियामक सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI)  आर्थिक सल्ला देणाऱ्या लोकांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यावर लक्ष ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची तयारी करत आहे.

हेही वाचा : Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

सेबीचे सदस्य एसके मोहंती यांनी मुंबईतील कॉर्पोरेट गव्हर्नन्सशी संबंधित एका कार्यक्रमात सांगितले की, आम्ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याच्या दिशेने काम करत आहोत. खरं तर, कोरोना महामारी  नंतर शेअर बाजारात किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. त्याचप्रमाणे आर्थिक आणि गुंतवणूक सल्ला देणाऱ्या ऑनलाइन सल्ला देणाऱ्या लोकांच्या संख्या देखील वेगाने वाढली आहे. या गुंतवणूक सल्ला देणारे लोक अधिकृत नाहीत, तरीही ते सोशल मीडियाद्वारे लोकांना गुंतवणुकीचा सल्ला देतात.

गेल्या एका वर्षात, IPO आणि स्टार्टअप टेक कंपन्यांच्या स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट करताना या सल्ला देणाऱ्या लोकांची भूमिका अतिशय संशयास्पद होती. कंपन्या या आर्थिक प्रभावकांना त्यांच्या शेअर्सचा दर वाढवण्यासाठी पैसे देतात आणि गुंतवणूकदारांना या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास सुचवतात.

सेबीच्या नियमांनुसार आर्थिक सल्लागारांना स्वतःची नोंदणी करावी लागते. देशात 1,300 पेक्षा जास्त आर्थिक सल्लागार आहेत. ऑनलाईन आर्थिक सल्ला देणाऱ्या लोकांच्या वाढत्या प्रभावामुळे सेबीचीही चिंता वाढली आहे. 2021-22 मध्ये, फायनान्स आणि क्रिप्टोकरन्सीशी संबंधित मजकुरामध्ये आर्थिक प्रभावशाली आणि सेलिब्रिटींनी 415 लोकांच्या तक्रारी आल्या आहेत. अलीकडेच सेबीच्या प्रमुखांनीही ऑनलाईन आर्थिक सल्ला देणाऱ्या बद्दल चिंता व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT