Economy 
अर्थविश्व

अर्थव्यवस्थेची घोडदौड मंदावणार

पीटीआय

‘डन अँड ब्रॅडस्ट्रीट’चा अंदाज; अनिश्‍चित स्थितीने मागणीवर परिणाम
नवी दिल्ली - देशभरात सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम सुरू असल्याने अर्थव्यवस्थेवर अनिश्‍चितता असून, २०१८-१९ या वर्षात आर्थिक विकासदरावर परिणाम होईल, असा अंदाज ‘डन अँड ब्रॅडस्ट्रीट’ या संस्थेच्या ताज्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीत विकासदरात घसरण नोंदविण्यात आली होती.

अर्थव्यवस्थेत अनिश्‍चित परिस्थिती निर्माण झाल्याने देशांतर्गत मागणीवर परिणाम झाला आहे. यामुळे औद्योगिक उत्पादनाला फटका बसेल, असे या अहवालात म्हटले आहे. ३१ मार्चअखेर औद्योगिक उत्पादन निर्देशांकात एक ते दीड टक्‍क्‍याची घसरण अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेतील प्रतिकूल परिस्थिती आणि देशांतर्गत समस्यांमुळे तिसऱ्या तिमाहीप्रमाणेच चौथ्या तिमाहीत विकासदर कमी राहील, असे ‘डन अँड ब्रॅडस्ट्रीट इंडिया’चे मुख्य अर्थतज्ज्ञ अरुण सिंग यांनी सांगितले. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर सरकारी यंत्रणा ठप्प झाली आहे. ज्यामुळे वृद्धीदरावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे, असे सिंग म्हणाले. नागरी हवाई वाहतूक, ऊर्जा, बॅंकिंग, बिगरबॅंकिंग आदी क्षेत्रांतील जोखीम जागतिक बाजारातील अस्थिरता आणि व्यापारी संघर्षामुळे वाढली आहे. अन्नधान्यांच्या किमतींमधील घसरणीने नजीकच्या काळात चलनवाढ निर्देशांक नियंत्रणात राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. एप्रिलमध्ये ग्राहक मूल्यावर आधारित चलनवाढीचा दर २.७ ते २.९ टक्‍क्‍यांदरम्यान राहील. घाऊक मूल्यावर आधारित चलनवाढीचा दर २.८ टक्के ते ३ टक्‍क्‍यांदरम्यान राहील, असे अहवालात  नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT