Egg prices have surged as temperature falls down
Egg prices have surged as temperature falls down 
अर्थविश्व

कांद्यांना नाही; पण अंड्यांना मिळतोय भाव!

सकाळवृत्तसेवा

अमरावती : थंडीमुळे मागणी वाढल्याने अंड्याच्या दरात तेजीचा अनुभव येत आहे. कधी काळी १०० रुपये प्रतिक्रेट असलेली अंडी थंडीमुळे १३५ ते १३७ रुपये प्रतिक्रेट विकल्या जात असल्याची माहिती अंड्याचे घाऊक व्यापारी हिमांशू ठाकूर यांनी 'एॅग्रोवन'ला दिली. 

विदर्भात तापमानात घट होत थंडी वाढीस लागली आहे. परिणामी अंड्यांना मागणी वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. अमरावती जिल्ह्यात आजच्या घडीला दरदिवशी सुमारे दहा लाख अंडी खवय्यांकडून फस्त केली जात असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. अंड्यांना मागणी वाढल्याचे परिणामी त्याचे दरही वाढले आहेत.

प्रथिनेयुक्‍त अंडी ही हिवाळ्यात शरीरासाठी पोषक राहतात. ही बाब लक्षात घेता खवय्यांकडून अंड्यांना मागणी वाढली आहे. 

सध्या एका क्रेट अंड्यासाठी १३५ ते १३७ रुपये मोजावे लागत आहेत. एका क्रेटमध्ये ३० अंडी राहतात. थंडीच्या काळात हेच दर राहतील, असा अंदाज असून फेब्रुवारीनंतर तापमानात जसजशी वाढ होईल तसे दरही कमी होतील. फेब्रुवारीनंतर प्रतिक्रेट १०० ते ११० रुपये असे दर राहण्याचा अंदाजही हिमांशू ठाकूर यांनी व्यक्‍त केला. प्रथिनेयुक्‍त अंडी ही हिवाळ्यात शरीरासाठी पोषक राहतात. ही बाब लक्षात घेता खवय्यांकडून अंड्यांना मागणी वाढली आहे. 

एका वर्षात २३० अंडी 
एका कोंबडीचे आयुष्य सरासरी दीड वर्षाचे राहते. एका वर्षात कोंबडी सरासरी २३० अंडी देते. यातील १६० अंडी ही खाण्याजोगी राहतात. लेयरच्या माध्यमातून ही अंडी तयार होतात. एका वर्षानंतर अंडी देणारी (लेयर) कोंबडी ही कटाईसाठी पाठविली जाते, असे विक्रेत्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौची सामन्यावर पकड, स्टॉयनिस अन् दीपक हुड्डा लढवला किल्ला

SCROLL FOR NEXT