Share Market News Updates esakal
अर्थविश्व

शेअर बाजार गडगडला, बँक घोटाळ्याचा परिणाम?

दोन्ही बेंचमार्क निर्देशांक घसरणीसह आठवड्याची सुरुवात झाली आहे

सकाळ वृत्तसेवा

दोन्ही बेंचमार्क निर्देशांक घसरणीसह आठवड्याची सुरुवात झाली आहे

देशांतर्गत शेअर बाजारात (Share Market) सोमवारी पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. दोन्ही बेंचमार्क निर्देशांक घसरणीसह आठवड्याची सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 1400 अंकांपर्यंत घसरला आणि 57,000 च्या खाली आला. त्याचवेळी निफ्टीही 17 हजारांच्या खाली घसरला. देशांतर्गत शेअर बाजारात आज दोन टक्क्यांची घसरण झाली. (Big Fall in Share Market)

आज दलाल स्ट्रीटवरील सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात चालू होते. सर्वात मोठी घसरण बँकिंग आणि वित्तीय समभागांमध्ये नोंदवली जात होती. रशिया-युक्रेन तणावाचा परिणाम जागतिक बाजारांवरही दिसून येत आहे. जपानचा निक्केई निर्देशांकही 2 टक्क्यांनी घसरला, कच्च्या तेलाच्या बाजारातही तेजी आली. ब्रेंट क्रूड ऑइल 1 टक्क्यांनी वाढून 95 डॉलर प्रति बॅरल झाले.

मागील काही दिवसांपासून सातत्याने अस्थिर असलेल्या शेअर बाजारातील (Share Market) सोमवारच्या व्यवहारावर ABG शिपयार्ड घोटाळ्याचे सावट आहे. ABG शिपयार्डने 28 बँकांना 22,842 कोटी रुपयांचा चुना लावल्याचे समोर आलं आहे. या घोटाळ्याचा परिणाम शेअर बाजारावर होणार असल्याची शक्यता दिसून येतीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT