Filatex India Limited
Filatex India Limited esakal
अर्थविश्व

Filatex India Limited: ही कंपनी 3 वर्षात देणार भरभक्कम परतावा; गुंतवणुकीची सुवर्ण संधी

सकाळ ऑनलाईन टीम

Filatex India Limited: टेक्सटाइल सेक्टरची कंपनी फिलाटेक्स इंडिया लिमिटेडच्या (Filatex India Limited) बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. यासाठी 28 डिसेंबरची तारीख निश्चित केली आहे. त्याच वेळी, त्याची एक्स-डेट 27 डिसेंबर आहे.

कंपनीच्या बोर्डाने जाहीर केले आहे की शेअर्स 1:2 च्या प्रमाणात स्प्लिट केले जातील. म्हणजे 100 शेअर्सची संख्या स्प्लिटनंतर 200 होईल. पण स्टॉक स्प्लिटमुळे तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्याची फेस व्हॅल्यू 2 रुपये प्रति इक्विटी शेअरवरून 1 रुपये इतके बदलेल.

फिलाटेक्स इंडिया हा गेल्या 3 वर्षात मल्टीबॅगर स्टॉक असल्याचे सिद्ध झाले आहे. सध्या शेअरची किंमत 75.80 रुपये आहे. मार्च 2020 मध्ये शेअरची किंमत 18.45 रुपये होती. याचा अर्थ या शेअरने 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 300% परतावा दिला आहे. मात्र, या वर्षी आतापर्यंत त्याचे शेअर्स 21 टक्क्यांनी घसरले आहेत. त्याच वेळी, गेल्या 5 वर्षांत 72 टक्के परतावा दिला आहे.

स्मॉलकॅप कंपनी फिलाटेक्स इंडियाची निव्वळ विक्री चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत 20.57% वाढून 1,163.42 कोटी रुपये झाली आहे. तर सप्टेंबर 2021 मध्ये हा आकडा 964.95 कोटी होता. त्याच वेळी, सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 25.16 कोटी होता, जो मागील वर्षी याच कालावधीत 73.78 कोटी होता. याचा अर्थ कंपनीचा नफा कमी झाला आहे. सप्टेंबर 2022 मध्ये EBITDA 56.77 कोटी रुपये होता, जो सप्टेंबर 2021 मध्ये 131.92 कोटी रुपयांच्या तुलनेत 56.97% कमी आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT