Finance Minister Nirmala Sitharaman declares to slash the corporate tax rates for domestic companies 
अर्थविश्व

अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; 'या' क्षेत्राला मिळणार दिलासा

वृत्तसंस्था

पणजी : अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज एक मोठी घोषणा केली. देशावर मंदीचे सावट असतानाच उद्योग जगताला सितारामन यांनी दिलासा दिला आहे. कंपन्या व व्यावसायिकांना भरावा लागणारा कॉर्पोरेट टॅक्स घटविण्याचा मिर्णय अर्थमंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्राला काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.   

कॉर्पोरेट टॅक्स घटविण्याचा अध्यादेश पारित झालेला आहे, अशी माहिती सितारामन यांनी पत्रकार परिषदेत दिली. गोवा येथे होत असलेल्या जीएसटी कौन्सिलच्या मीटिंगपूर्वी अर्थमंत्र्यांनी ही पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली. या घोषणेमुळे गेले अनेक दिवस मंदीचे सावट असलेले उद्योग क्षेत्र पुन्हा उभारी घेईल. 'मेक इन इंडियाला प्रोत्साहित करण्यासाठी प्राप्तिकर कायद्यांमध्ये नवीन तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यानुसार 1 ऑक्टोबर 2019 या वर्षानंतर स्थापन झालेली कोणतीही नवी देशांतर्गत कंपनी तसेच नव्याने गुंतवणूक करत असलेली कंपनी यांना 15 टक्के दराने प्राप्तिकर आकारण्यात येईल.' असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

सितारामन यांनी ही घोषणा केल्यानंतर काही वेळातच शेअर बाजारतही घडामोडींना वेग आला आहे. सेन्सेक्स हो मोठ्या प्रमाणात वधारला असल्याने अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना मिळेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

'25 व्या वर्षी मला मोठा दिसतो म्हणून मालिकेतून काढलं' करिअरबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला...'मी खूप रडलो आणि...'

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT