Share Market Sakal
अर्थविश्व

Share Market: कोणते 10 शेअर्स दाखवणार कमाल? आज शेअर बाजारात काय असेल स्थिती?

Share Market: गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी बाजारात वाढ दिसून आली.

शिल्पा गुजर

Share Market Updates: गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी बाजारात वाढ दिसून आली. कच्च्या तेलाच्या किमतीत काहीशी घसरण झाली असून जागतिक संकेतही सुधारले आहेत. त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला. सकारात्मक जागतिक संकेतांमध्‍ये बाजारात गॅप-अप ओपनिंग दिसले आणि त्यानंतर भाजपच्या विजयाच्या शक्यतांसोबतच बाजाराची तेजीही वाढत गेली. पण, व्यवहाराच्या शेवटच्या तासात काही प्रमाणात नफावसुली झाली.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 817.06 अंकांच्या अर्थात 1.50 टक्क्यांच्या वाढीसह 55,464.39 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 249.55 अंकांच्या अर्थात 1.53 टक्क्यांच्या वाढीसह 16,594.90 वर बंद झाला. दरम्यान, रशिया आणि युक्रेनचे परराष्ट्र मंत्री तुर्कस्तानमध्ये भेटणार असल्याची बातमी आली. त्यामुळे दोन्‍ही देशांमध्‍ये चर्चेच्‍या माध्‍यमातून चर्चा होण्याची शक्‍यता होती.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील उच्चस्तरीय चर्चेच्या अपेक्षेने आणि आशियाई बाजारातील तेजीचे सकारात्मक संकेत यामुळे भारतीय शेअर बाजारही मजबूत गॅप-अपसह उघडल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या विनोद नायर यांनी सांगितले. दुसरीकडे कमकुवत पश्चिम बाजार आणि इसीबी आणि युएस सीपीआय डेटाच्या आधी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे बाजारात अस्थिरता वाढली आहे.

तांत्रिकदृष्ट्या निफ्टीने ही पोकळी भरून काढली आहे आणि 89-HMA वरून उसळी घेतली आहे जी काउंटरमधील तेजीचे लक्षण असल्याचे चॉईस ब्रोकिंगचे पलक कोठारी म्हणाले. निफ्टीने आवर्ली चार्ट चार्टवर हॅमर कॅंडलस्टिक पॅटर्न तयार केला आहे, जो तेजीचे संकेत देत आहे. याशिवाय निफ्टीने 21 आणि 50 HMA वर क्लोजिंग दिले आहे जे पुढील चढ-उताराची शक्यता दर्शविते. निफ्टीला 16,400 वर सपोर्ट आणि 16,900 वर रेझिस्टन्स आहे, तर बँक निफ्टीला 33,700 वर सपोर्ट आणि 35,000 ला रेझिस्टन्स आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

हिन्दूस्थान युनिलिव्हर लिमिटेड (HINDUNILVR)

टाटा स्टील (TATASTEEL)

ग्रासिम (GRASIM)

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

एसआरएफ लिमिटेड (SRF)

फेडेरल बँक (FEDERALBNK)

पेज इंडिया (PAGEIND)

महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&MFIN)

व्होल्टास (VOLTAS)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bike Accident: आईला घेण्यासाठी आलेल्या दोघांवर काळाचा घाला; खुलताबाद रस्त्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीच्या धडक, दोन्ही मित्र ठार

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरणातून आज सकाळी ९,४३२ क्युसेक विसर्ग; गोदावरी खोऱ्यातील गावांना सतर्कतेचा इशारा

Nagpur Crime : महिलेला करायला लावली नग्न पूजा, व्हिडिओ बनवला अन्...नागपुरात भोंदूबाबाचा प्रताप उघड, 'असं' शोधायचा सावज

Neeraj Chopra: ऑलिंपिक पदकविजेता नीरज चोप्राची ब्रुसेल्स स्पर्धेतून माघार, पण अंतिम फेरीत दाखवणार आपला दम

Mahabaleshwar Rain Update; 'महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस'; भिलारमधील शाळेचा स्लॅब कोसळला, ग्रामस्थांची धावपळ

SCROLL FOR NEXT