Flexi-cap fund esakal
अर्थविश्व

दीर्घ कालावधीत भरघोस रिटर्न्स देणारे शेअर्स! मार्केटमध्ये करा गुंतवणूक

5 वर्षांतील टॉप स्कीम्सचा परतावा पाहा

शिल्पा गुजर

फ्लेक्‍सी-कॅप फंड्स ही म्‍यूचुअल फंडचीच एक कॅटेगरी आहे. ही एक ओपन-एंडेड इक्विटी स्कीम आहे.

शेअर बाजाराच्या अस्थिर वातावरणातही तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात का? पण फारशी जोखीम नको असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. शेअर बाजारातील घसरणीत नव्या गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडात प्रवेश करण्याची चांगली संधी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गुंतवणुकीचे टारगेट 5 वर्ष किंवा त्याहून अधिक असल्यास फ्लेक्सी-कॅप फंड हा चांगला पर्याय असू शकतो.

फ्लेक्सी-कॅप फंड ही म्युच्युअल फंडांचीच एक कॅटेगरी आहे. ही एक ओपन-एंडेड इक्विटी स्कीम आहे. फ्लेक्सी-कॅप फंडामध्ये, गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवण्यासाठी फंड मॅनेजरला कंपनीच्या कोणत्याही कॅटेगरीचे शेअर्स निवडण्याचे स्वातंत्र्य असते. यामध्ये, फंड मॅनेजरसमोर कोणतेही बंधन नाही. त्यामुळेच फंड मॅनेजरला वैविध्यपूर्ण (Diversified) पोर्टफोलिओ तयार करण्यास मदत होते.

कोणी गुंतवणूक करावी

ज्या गुंतवणूकदारांना पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी फ्लेक्सी-कॅप फंड हा एक चांगला पर्याय असल्याचे बीपीएन फिनकॅपचे (BPN Fincap) संचालक ए.के. निगम यांचे म्हणणे आहे. बाजाराच्या पडझडीत नवीन गुंतवणूकदारांना बाजारात येण्याची ही चांगली संधी आहे.

फ्लेक्सी-कॅप स्कीम्समध्ये महागाईवर मात करण्याची आणि जास्त परतावा देण्याची क्षमता आहे. लार्ज कॅप फंडांनंतर ही दुसरी सर्वात मोठी इक्विटी म्युच्युअल फंड कॅटेगरी असल्याचे ए.के. निगम म्हणाले. तुम्हाला कमी जोखीम घ्यायची असेल तर फ्लेक्सी-कॅप फंड हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये रिस्‍क-रिटर्नचा बॅलेन्स राखला आहे. यात स्थिर परतावा मिळतो.

टॉप फ्लेक्‍सी फंड्सचा मागील 5 वर्षातील परतावा

1) एसबीआय फोकस्ड इक्विटी फंड (SBI Focused Equity Fund)

एसबीआय फोकस्ड इक्विटी फंडाने गेल्या 5 वर्षांत 22.01 टक्के परतावा दिला आहे. यामध्ये 1 लाखांची गुंतवणूक गेल्या पाच वर्षांत 2 लाख 70 हजार रुपये झाली. त्याच वेळी, 10,000 मासिक एसआयपीची किंमत आज 11.23 लाख रुपये आहे. या योजनेत 5,000 रुपयांची गुंतवणूक करता येते. त्याच वेळी, तुम्ही या योजनेत किमान 500 रुपयांच्या एसआयपीसह गुंतवणूक सुरू करू शकता.

2) पीजीआयएम इंडिया फ्लेक्सी कॅप फंड (PGIM India Flexi Cap Fund)

या फंडने गेल्या 5 वर्षात 23.12 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. यामध्ये 1 लाखाची गुंतवणूक गेल्या पाच वर्षांत 2 लाख 83 हजारांवर गेली आहे. त्याच वेळी, 10,000 मासिक एसआयपीची किंमत आज 11.80 लाख रुपये आहे. या योजनेत 5000 रुपयांची गुंतवणूक करता येईल. त्याच वेळी, तुम्ही या योजनेत किमान 1,000 रुपयांच्या एसआयपीसह गुंतवणूक सुरू करू शकता.

3) एचडीएफसी रिटायरमेंट सेविंग्‍स फंड इक्विटी प्‍लान (HDFC Retirement Savings Fund Equity Plan)

एचडीएफसी रिटायरमेंट सेव्हिंग्स फंड इक्विटी प्लॅनने गेल्या 5 वर्षांत 19.11 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. यामध्ये 1 लाखाची गुंतवणूक गेल्या पाच वर्षांत 2 लाख 40 हजार झाली आहे. त्याच वेळी, 10,000 एसआयपीची किंमत आज 10.39 लाख रुपये आहे. या योजनेत 5000 रुपयांची गुंतवणूक करता येईल. त्याच वेळी, तुम्ही या योजनेत किमान 500 रुपयांच्या एसआयपीसह गुंतवणूक सुरू करू शकता.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT