india forex reserve sakal
अर्थविश्व

Forex Reserves : देशाच्या परकीय चलनात 2 वर्षांतील सर्वात मोठी घट

भारतातील परकीय चलनाचा साठा सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेसाठी ही चिंतेची बाब ठरत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Forex Reserve : भारतातील परकीय चलनाचा साठा सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेसाठी ही चिंतेची बाब ठरत आहे. आज रिझर्व्ह बँकेने (RBI) परकीय चलन साठ्याची आकडेवारी जाहीर केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आकडेवारीनुसार देशाचा परकीय चलन साठा 2 वर्षांपेक्षा सर्वात खालच्या पातळीवर गेला आहे. देशाच्या रुपयाची घसरण हे देखील याचे मुख्य कारण आहे.

देशाचा परकीय चलनाचा साठा किती आहे ?

21 ऑक्टोबरला देशाचा परकीय चलन साठा $3.85 अब्ज डॉलरने कमी होऊन $524.52 अब्ज झाला होता. ही परकीय चलन साठ्यातील 2 वर्षांपेक्षा जास्त नीचांकी पातळी आहे. रुपयाची सततची घसरण रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी ते पुरेशे नाहीत. परिणामी परकीय चलनाच्या साठ्यात घट होत आहे.

भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत मोठी घसरण होण्याचे कारण म्हणजे देशाचे चलन सतत खालच्या पातळीवर जात आहे. रुपयाची घसरण थांबवण्यासाठी आरबीआयला आपल्या तिजोरीतून अधिक डॉलर्स विकावे लागतील. त्यामुळे परकीय चलन साठा आणखी कमी होईल.

परकीय चलन संपत्ती आणि सोन्याच्या साठ्याची आकडेवारी :

परकीय चलन संपत्ती 21 ऑक्टोबर रोजी $ 3.59 अब्जने कमी होऊन $ 465.08 बिलियनवर आली आहे. याशिवाय सोन्याचा साठा 247 लाख डॉलरवरून 37.21 लाख डॉलरवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT