अर्थविश्व

इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोलनंतर डिझेलची शंभरी

सूरज यादव

नवी दिल्ली - भारतात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या इंधन दरवाढीचा आज भडका उडाला आहे. पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल 102 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.84 रुपयांवर पोहोचले आहेत. बुधवारी पेट्रोलच्या दरात 25 पैसे तर डिझेलच्या दरात 13 पैशांची वाढ झाली. दिल्लीत यामुळे पेट्रोल 96.66 रुपये प्रति लिटर तर डिझेल 87.41 रुपये प्रति लिटरवर पोहोचले. इंधनाचे दर प्रत्येक दिवशी बदलतात. जागतिक पातळीवर होणाऱ्या चढ उतारानुसार हे दर ठरतात.

देशात सर्वाधिक राजस्थानमध्ये पेट्रोलसाठी 107.79 रुपये प्रति लिटर इतका दर आहे. तसंच इथं डिझेलने शंभरी पार केली असून 100.51 रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागत आहेत. मध्य प्रदेशातही पेट्रोल 107.43 रुपये प्रति लिटर तर डिझेल 98.43 रुपये प्रति लिटर मिळत आहे.

महाराष्ट्रात परभणीत पेट्रोलचा दर 105.15 रुपयांवर गेला आहे तर डिझेल 95.63 रुपयांवर पोहचला आहे. याशिवाय नांदेडमध्येही 105 रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल विकले जात आहे. तसंच बीड, जालना, सिंधुदुर्ग, यवतमाळ जिल्ह्यांमध्येही 104 रुपये प्रति लिटर दराने पेट्रोलची विक्री सुरु आहे.

देशात 4 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जवळपास 25 वेळा वाढ झाली. या काळात पेट्रोलचे दर 5.54 रुपयांनी तर डिझेलचे दर 6.63 रुपयांनी वाढले आहेत. तेल कंपन्यांकडून दर ठरवत असताना आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 15 दिवसातील दराच्या सरासरीवरून निर्णय घेतात. इंधनाचे दर वाढण्याचे कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढ हे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT