पेट्रोल sakal
अर्थविश्व

एक महिन्यात पेट्रोल डिझेलच्या दराचा भडका; जाणून घ्या आजचे दर

सकाळ डिजिटल टीम

ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत जवळपास २० वेळा पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत.

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा भडका ऑक्टोबरमध्ये सातत्यानं सुरुच आहे. दोन दिवस दर स्थिर राहिल्यानंतर बुधवारी पुन्हा किंमती वाढवण्यात आल्या होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूडमध्ये ०.७३ टक्क्यांनी वाढ झाल्यानं दर प्रति बॅरल ८५.२६ डॉलर इतके झाले होते. तर कच्च्या तेलाच्या किंमतीतसुद्धा वाढ झाली. गेल्या तीन वर्षातील ही कच्च्या तेलाची उच्चांकी किंमत आहे.

आज पुन्हा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली असून दिल्लीत पेट्रोलचा दर १०७.५९ रुपये तर डिझेल ९६.३२ रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत ११३.४६ रुपये तर डिझेलची किंमत १०४.३८ रुपये इतकी आहे. कोलकात्यात पेट्रोल १०८.११ रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे. तर डिझेलचे दर ९९.४३ रुपये प्रति लिटर इतके आहेत. पटनामध्ये १११.२४ रुपये प्रति लिटर पेट्रोल असून डिझेल १०२.३९ रुपये दराने विकले जात आहे.

ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत जवळपास २० वेळा पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत. २४ सप्टेंबरपासून पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली असून पेट्रोल प्रति लिटर ६.४० रुपये तर डिझेल प्रति लिटर ७.७० रुपयांनी महाग झालं आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर १०० ते ११० रुपयांच्या वर पोहोचले आहेत. भोपाळमध्ये सर्वाधिक ११६ रुपये लिटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे. तर डिझेलसुद्धा १०५ रुपये प्रति लिटर इतके महाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT