Fuel Sakal
अर्थविश्व

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पेट्रोल-डिझेलचा भडका; पाचवेळा दरात वाढ

सकाळ डिजिटल टीम

गेल्या आठ दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात पाच वेळा वाढ झाली आहे. आज पुन्हा इंधन तेलाचे दर वाढले आहेत.

कच्च्या तेलांचे दर वाढल्यानं इंधन तेलांचे दर वाढत आहेत. गेल्या आठ दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात पाच वेळा वाढ झाली आहे. आज पुन्हा इंधन तेलाचे दर वाढले आहेत. दिल्लीत पेट्रोलच्या दरात २० पैशांची वाढ झाली असून डिझेलच्या किंमतीत प्रति लीटर ३५ पैशांनी वाढ झाली. गेल्या चार दिवासात दिल्लीत पेट्रोलचा दर १.१० रुपयांनी वाढला. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठ दिवसातच पेट्रोलच्या दरात दीड रुपयापेक्षा जास्त वाढ झाल्याचं दिसत आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती तीन वर्षांत सर्वाधिक आहे. मात्र, ब्रेंट क्रूडचा दर १.०७ टक्के कमी होऊन तो ८०.२१ डॉलर प्रति बॅरेल इतका झाला आहे. दिल्लीत आज पेट्रोलचे दर १०३. ५४ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९२.१२ रुपये प्रति लीटर इतके आहेत. मुंबईत पेट्रोल १०९.५४ रुपये प्रति लिटर इतक्या दराने विक्री सुरु असून डिझेल शंभरी गाठण्याची शक्यता आहे. सध्या डिझेल ९९.९२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

कोलकाता: पेट्रोल – 104.23 रुपये प्रति लिटर; डिझेल – 95.23 रुपये प्रति लिटर

चेन्नई : पेट्रोल –101.01 रुपये प्रति लिटर; डिझेल – 96.60 रुपये प्रति लिटर

बेंगळुरु : पेट्रोल – 107.04 रुपये प्रति लिटर ; डिझेल – 97.77 रुपये प्रति लिटर

भोपाळ : पेट्रोल – 112.07 प्रति लिटर; डिझेल – 101.17 रुपये प्रति लिटर

पाटना: पेट्रोल – 106.59 प्रति लिटर; डिझेल – 98.65 रुपये प्रति लिटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

SCROLL FOR NEXT