Gautam Adani  Sakal
अर्थविश्व

Gautam Adani : "याच भारताच्या खऱ्या हिरो" त्यांची कहाणी ऐकून अदानींच्या डोळ्यात पाणी

आयुष्यात त्यांना कोण प्रेरणा देत. याबाबत त्यांनी आपले मत मांडले आहे.

सकाळ डिजिटल टीम

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या आयुष्यात त्यांना कोण प्रेरणा देत याबाबत त्यांनी आपले मत उघडपणे मांडले आहे.

यासोबतच त्यांनी सांगितले की, भारतातील सामान्य लोकांसोबतच येथील दोन असामान्य महिलांच्या कथेने त्यांना सर्वात जास्त प्रेरणा दिली आहे. खर्‍या अर्थाने त्यांच्यासाठी त्या देशाच्या खऱ्या हिरो आहेत.

एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गौतम अदानी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. जीवनात प्रेरणा कोठून मिळते असे विचारले असता. त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे अनेक गुण सांगून उत्तर दिले. दोन विलक्षण महिलांचाही उल्लेख केला, ज्यांच्या कथांनी त्यांच्या डोळ्यात पाणी आणले.

अरुणिमा सिन्हा आणि किरण कनोजिया यांच्या कथांनी ते खूप प्रभावित झाल्याचे गौतम अदानी यांनी सांगितले. या दोन असाधारण महिला आहेत. ज्यांनी दुर्दैवाने आपले हातपाय गमावले, परंतु तरीही जग जिंकले.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

अरुणिमाने एव्हरेस्टवर चढाई केली असून ब्लेड रनर किरण मॅरेथॉनमध्ये धावत आहे. दोघीही अतुलनीय महिला आणि भारताची शान आहेत.

गौतम अदानी म्हणाले की, या दोघी नव्या भारताच्या खरे हिरो आहेत. त्यांच्या कथांनी त्यांना इतके प्रभावित केले की, त्यांच्या डोळ्यांतून अश्रू तरळले.

गौतम अदानी म्हणाले की, भारतातील एक सामान्य माणूस म्हणून, सरासरी भारतीयाचे धैर्य, सामर्थ्य, लवचिकता आणि तपश्चर्या त्यांच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे.

गौतम अदानी म्हणाले की, 2022 हे वर्ष त्यांच्यासाठी मोठे होते. त्यांनी आपला 60 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांच्या कुटुंबाने अदानी फाऊंडेशनला 60,000 कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले.

हा पैसा शिक्षण, आरोग्य सेवा आणि कौशल्य विकासासाठी सहकार्य करण्यासाठी वापरला जाईल. या सेवा देशाच्या मूलभूत गरजा देखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayan Ahmed: एक सल्ला, नंतर 'तो' मॅसेज अन् सापळा... अयान अहमदनं तरुणींना जाळ्यात कसं ओढलं? पडद्यामागचा सल्लागार लव्हगुरू कोण?

Latest Marathi News Live Update: बदनापूरमध्ये पाणीटंचाईची दाहकता

KCC Campaign : पशुपालकांसाठी खुशखबर! 'किसान क्रेडिट कार्ड'वर मिळणार ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; राज्य शासनाची विशेष 'KCC' मोहीम

Cricket Viral Video: IPL काय बघताय? इथे तर पठ्ठ्याने मैदानावरच नांगर फिरवला; सामना थेट बंद! खेळाडू, रेफरी अन् प्रेक्षक हैराण

SRH vs CSK: चेन्नईच्या संघात मोठा बदल होणार! स्पर्धेतून बाहेर झालेल्या खलील अहमदची जागा घेण्यासाठी ४ खेळाडूंचे पर्याय

SCROLL FOR NEXT