nadir godrej sakal media
अर्थविश्व

गोदरेज इंडस्ट्रीच्या अध्यक्षपदी नादीर गोदरेज यांची वर्णी लागणार

कृष्ण जोशी

मुंबई : गोदरेज इंडस्ट्रीजचे (godrej industry ) अध्यक्ष (president) आदी गोदरेज (adi godrej) हे येत्या एक ऑक्टोबर रोजी आपल्या पदाची (chief post) सूत्रे खाली ठेवणार असून नादीर गोदरेज (nadir godrej) हे त्यांची जागा घेतील.

गोदरेज इंडस्ट्रीतर्फे आज ही माहिती प्रसिद्धीस देण्यात आली आहे. आदी गोदरेज हे गोदरेज इंडस्ट्रीज चे अध्यक्ष आणि संचालक म्हणून पायउतार होतील. मात्र ते गोदरेज इंडस्ट्रीज चे मानद अध्यक्ष तसेच गोदरेज ग्रूपचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. सध्या गोदरेज इंडस्ट्रीज चे व्यवस्थापकीय संचालक असलेले नादीर गोदरेज हे आता कंपनीचे अध्यक्ष होतील.

गेली चाळीस वर्षे कंपनीची सेवा करताना कंपनीने उत्तम कामगिरी केली, संचालक मंडळाने तसेच सर्व सहकाऱ्यांनी या काळात दिलेल्या पाठिंब्याबद्दल व मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. संचालकांनी व सर्व सहकाऱ्यांनी तळमळीने, आवडीने आणि मेहनतीने हे यश मिळवले. त्याचप्रमाणे आमचे ग्राहक, व्यावसायिक भागीदार, गुंतवणुकदार यांचादेखील या यशात वाटा आहे, असे आदी गोदरेज यांनी यासंदर्भात म्हटले आहे.

यापुढेही नादीर गोदरेज यांच्या नेतृत्वाखाली कंपनी अशीच उच्चप्रतीची कामगिरी नोंदवेल व आपले लक्ष्य गाठेल, असेही त्यांनी म्हटले आहे. कंपनीला मार्गदर्शन करून तिला घडवणारे अध्यक्ष आदी गोदरेज यांची दूरदृष्टी, त्यांची नीतीतत्वे व नेतृत्व याबद्दल मी संचालक मंडळातर्फे त्यांचे आभार मानतो, असे नादीर गोदरेज यांनी म्हटले आहे. याच वाटेवरून कंपनीची पुढील वाटचाल होईल व याच पद्धतीने ग्राहकांची व समाजाची सेवा करून गुंतवणुकदारांना दीर्घकाळ परतावा दिला जाईल, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Meeting News: दिवाळीआधी पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; फडणवीस सरकारने घेतले तीन महत्त्वाचे निर्णय

'सीता और गीता' साठी हेमामालिनी नाही तर 'या' अभिनेत्रीला झालेली विचारणा; नकार दिल्याचा आजही होतोय पश्चाताप

Fastag : भावाने फास्टॅगला खरं लुटलं! 13 राज्ये फिरून आला अन् वाचवले इतके रुपये, टोल प्लाझावाले बघतच राहिले, तुम्हीपण वापरू शकता ही ट्रिक

Education News : टीईटी परीक्षा बनली 'कमाईचा स्रोत'; शुल्कवाढीमुळे सरकारने ₹५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला!

Pimpri Metro: मेट्रोचा पादचारी पूल अद्याप अपूर्णच; मोरवाडी चौकात संथगतीने काम, धोका पत्करून रस्ता ओलांडण्याची वेळ

SCROLL FOR NEXT