Gold  Gold
अर्थविश्व

सोने-चांदी महागले; आणखी भाव वाढण्याचे संकेत

राजेश रामपूरकर

नागपूर : सणासुदीचे दिवस जवळ आल्याने सोने-चांदीची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे आठ दिवसांत सोने प्रति दहा ग्रॅम ५०० तर चांदी प्रति किलो ८०० रुपयांनी महागली आहे. आता दोन दिवसांनी पितृपक्ष संपताच नवरात्र, दसरा आणि दिवाळी येणार आहे. या काळात ग्राहकांची बाजारात खरेदीसाठी वर्दळ वाढत असल्याने दोन्ही धातूचे भाव वाढण्याचे संकेत आहेत.

गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने भीतीचे वातावरण होते. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह नव्हता. मात्र, आता कोरोनाची भीती कमी झाली असून, प्रादुर्भावही कमी झालेला आहे. त्यामुळे बाजारातील ग्राहकांची गर्दी वाढलेली आहे. वर्षभरापासून ५० हजारांच्या जवळपास सोने स्थिरावले आहे. सध्याही सोन्याचे भाव घटलेल्या स्थितीत स्थिरावलेले आहे. त्यामुळे मागणी वाढण्याची शक्यता आहे.

सध्या प्रति दहा ग्रॅम सोन्यासाठी ४७ हजार १०० रुपये मोजावे लागत आहे. तर प्रति किलो चांदीसठी ६१ हजार ८०० रुपये मोजावे लागत आहे. आठ दिवसांपूर्वी सोने प्रति दहा ग्रॅम ४६ हजार ६०० तर चांदी प्रति किलो ६१ हजार रुपयांवर होती. त्यात वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे. पुढील काळात दोन्ही धातूचे भाव वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्‍यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा मोठा बदल! काय आहे आजचा भाव? पुढे सोनं महागणार की स्वस्त होणार?

Latest Marathi News Live Update : नवी मुंबई विमानतळ आज सहा तास बंद राहणार

Thalapathy Vijay Tamil Nadu Politics : थलपती विजय यांच्याकडे बहुमत नाही, तामिळनाडून सत्तागणिताच्या तीन शक्यता; द्रमुक आणि अण्णाद्रमुक 'विजयी' वारू रोखणार?

Solapur Zilla Parishad: सोलापूर जिल्हा परिषदेत गटनोंदणीला वेग; मोहिते-पाटील गटाचा नवा राजकीय समीकरण, चार पक्ष आणि तीन आघाड्या!

Stock Market Today: शेअर बाजाराची संथ सुरुवात; ट्रम्पच्या धमकीने गुंतवणूकदार सावध

SCROLL FOR NEXT