Gold-and-Silver 
अर्थविश्व

सोने, चांदीची झळाळी झाली कमी; पाहा आजचे भाव

वृत्तसंस्था

नवी दिल्ली ः डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याचा फटका बुधवारी सोने आणि चांदीला बसला. दिल्लीत सोन्याच्या भावात 215 रुपयांची, तर चांदीच्या भावात 770 रुपयांची घसरण झाली.

जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात झालेल्या घसरणीमुले डॉलरच्या तुलनेत आज दिवसभरात रुपया वधारला. यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक कमी करण्यास प्राधान्य देऊन शेअर बाजाराकडे मोर्चा वळविला. यामुळे सोन्याच्या भावात घसरण झाली, अशी माहिती एचडीएफसी सिक्‍युरिटीजचे वरिष्ठ विश्‍लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिली.

दिल्लीतील सराफा बाजारात शुद्ध सोन्याचा भाव आज प्रतिदहा ग्रॅमला 215 रुपयांची घसरण होऊन 38 हजार 676 रुपयांवर आला. याचवेळी चांदीचा भावही प्रतिकिलोमागे 770 रुपयांची घट होऊन 47 हजार 690 रुपयांवर बंद झाला. कालही सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली होती.

जागतिक पातळीवरही घसरण
अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक "फेडरल रिझर्व्ह'कडून व्याजदराबाबत काय निर्णय होतो, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. यामुळे जागतिक पातळीवर आज सोने, चांदीच्या भावात घसरण नोंदविण्यात आली. सोन्याचा भाव प्रतिऔंस 1 हजार 500 डॉलरवर आला, तर चांदीचा भाव प्रतिऔंस 17.81 डॉलरवर आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT