अर्थविश्व

सोनं ४० हजारांच्या खाली येणार? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात

सकाळन्यूजनेटवर्क

Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्यानं कपात होत आहे. उच्चांकीवाढीपासून आतापर्यंत सोन्याच्या दरांत प्रति तोळा तब्बल २० टक्क्यांची म्हणजेच जवळपास १२ हजार रुपयांची कपात पाहायला मिळाली. पुढील काही दिवस  सोन्याच्या किंमतीमध्ये आणखी कपात होऊ शकते, असा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करत असाल तर आणखी काही दिवस थांबण्याचा सल्ला काही तज्ज्ञ देत आहेत. सध्या सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची योग्य संधी आहे. मात्र, आणखी काही दिवस वाट पाहिल्यास सोन्याची किंमत प्रति तोळा ४० हजार रुपयांच्या खाली येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 
 
गोल्ड बॉन्डमधील गुंतवणुकीचं वाढतं प्रमाण आणि कमकुवत होणाऱ्या डॉलरचा परिणाम थेट सोन्याच्या किंमतीवर होत आहे. वाढत्या महागाईच्या काळात अनेकजण सुरक्षित आणि दिर्घकालीन गुंतवणूक म्हणून सोन्याऐवजी गोल्ड बॉन्डला पसंती दर्शवत आहेत. पण पुढील काही दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

किती रुपयांपर्यंत घसरु शकते किंमत ?
सध्या सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. बुधवारी सोन्याचा दर प्रति तोळा ४४ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहचला होता. ऑगस्ट २०२० मध्ये सोनं प्रति तोळा ५६ हजार रुपयांपर्यंत पोहचलं होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये झपाट्यानं घट होत आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सोन्याची किंमत प्रति तोळा ४० हजार रुपयांच्या खाली येऊ शकते. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आणखी काही दिवस वाट पाहा. सध्याच्या घडीलाही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे. 

याआधी ४० हजारांच्या खाली कधी होतं?
ऑक्टोबर २०१९ मध्ये सोनं प्रति तोळा ४० हजार रुपयांच्या खाली होतं. तेव्हापासून अमेरिका आणि चीन यांच्यामधील व्यापार युद्ध आणि नंतर कोरोना आलेलं कोरोना महामारीचं संकट, यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये सातत्यानं वाढ पाहायला मिळाली. काही गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवत आहे.  

सध्याच्या गुंतवणूकीचं काय?
सध्या कोणताही तज्ज्ञ सोनं विकण्याचा सल्ला देत नाही. काही विश्लेषकांच्या मते, मर्यादीत कालावधीसाठी सोन्यामध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतणूक करण्याची मोठी संधी आहे. पुढील सात ते आठ महिन्यानंतर सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होऊ शकते. पुढील महिनाभरात सोन्याची किंमत ४८ हजारांच्या पुढेही जाऊ शकते.  

 कशी कराल गुंतवणूक?
सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय आहेत. ज्यामध्ये गोल्ड म्युच्युअल फंडाचाही(gold mutual fund) समावेश आहे. गोल्ड म्युच्युअल फंडानं वर्षभरात १३ टक्के रिटर्न दिलं आहे. जे एखाद्या एफडीपेक्षा नक्कीच चांगलं आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT