gold price google
अर्थविश्व

Gold price : सोन्याच्या दरांत १ ते १०० रुपयांची वाढ

यात कालच्या तुलनेत अनुक्रमे १ रुपये, ८ रुपये, १० रुपये आणि १०० रुपयांची वाढ झाली आहे.

नमिता धुरी

मुंबई : आज देशपातळीवर सोन्याच्या दरात १ ते १०० रुपयांची वाढ झालेली दिसत आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ५ हजार १६६ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ४१ हजार ३२८ रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ५१ हजार ६६० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याचा दर ५ लाख १६ हजार ६०० रुपये आहे. यात कालच्या तुलनेत अनुक्रमे १ रुपये, ८ रुपये, १० रुपये आणि १०० रुपयांची वाढ झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ४ हजार ७३६ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ३७ हजार ८८८ रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ४७ हजार ३६० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याचा दर ४ लाख ७३ हजार ६०० रुपये आहे. यात कालच्या तुलनेत अनुक्रमे १ रुपये, ८ रुपये, १० रुपये आणि १०० रुपयांची वाढ झाली आहे.

काही महत्त्वाच्या शहरांतील सोन्याचे दर (१ ग्रॅम)

शहर २२ कॅरेट २४ कॅरेट

मुंबई ४ हजार ७३६ ५ हजार १६६

चेन्नई ४ हजार ८२१ ५ हजार २५९

पुणे ४ हजार ७३९ ५ हजार १६९

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे ?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT