gold rates today 
अर्थविश्व

Gold Price - सोनं 42 हजारापर्यंत होऊ शकतं स्वस्त; आज काय होणार?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात आता व्हॅक्सिनबाबत आनंदाच्या बातम्या येत असल्यानं लोकांना दिलासा मिळत आहे. याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवरही होताना दिसत आहेत. सोन्याच्या किंमतीत घट होत असून ऑगस्टमध्ये उच्चांक गाठल्यानंतर सातत्याने सोनं स्वस्त होत आहे. काहीवेळा दर वाढलाही मात्र त्या तुलनेत किंमत कमी होण्याचं प्रमाण जास्त आहे. 

शुक्रवारीसुद्धा सोन्याच्या किंमती कमी झाल्या. गुरवारच्या तुलनेत सोन्याचे दर शुक्रवारी 94 रुपयांनी कमी झाले होते. यामुळे सोन्याचा दर 49 हजार 97 रुपये प्रति दहा ग्रॅम असा झाला होता. नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या दरात मोठी घट झाली. तर डिसेंबरमध्येही तसंच काहीसं चित्र आहे. पहिल्या आठवड्यात मात्र किंमतीत 490 रुपयांनी वाढ झाली होती. तर चांदी जवळपास 3 हजार रुपयांनी वधारली होती. 

दिल्लीतील सराफ बाजारात शुक्रवारी सोन्याची किंमत 102 रुपयांनी कमी झाली. यामुळे सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅमला 48 हजार 594 रुपये इतका झाला. त्याआधी सोन्याचा दर 48 हजार 696 रुपये इतका होता. तर चांदीच्या दरात मात्र केवळ 16 रुपयांची घट झाली. शुक्रवारी चांदी 62 हजार 734 रुपये प्रति किलोग्रॅम होती. त्याआधी चांदीचा दर 62 हजार 750 रुपये प्रति किलो इतका होता. 

ऑगस्ट महिन्यात सोन्याचा दर 56 हजार 254 रुपयांवर पोहोचला होता. चांदी 76008 रुपये प्रति किलो इतकी झाली होती. त्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरू होत आहे. सराफ बाजारातील तज्ज्ञांच्या मतानुसार कोरोना व्हॅक्सिनमुळे शेअर बाजार वधारला असून सोन्याच्या विक्रीत वाढ झाली आहे. सोन्याच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता असून सोनं 42 हजार रुपयांपर्यंत किंमत कमी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narmada Water: २० वर्षांनंतर महाराष्ट्राला नर्मदा हक्क मिळाला, चार राज्यांमध्ये एकमत; फडणवीसांकडून ऐतिहासिक निर्णयाची घोषणा

Koyna Dam Water Level : कोयना धरणात दहा दिवसातच वाढला 27.77 टीएमसी पाणीसाठा; महाबळेश्वरला 24 तासांत 266 मिमी पाऊस, पाहा धरण आणि तालुकानिहाय आकडेवारी

Latest Marathi News Live Update : नागपुरात सर्वच भागात पावसाला सुरुवात

Pregnancy Test Kit : प्रेग्नन्सी टेस्ट किट नेमकं कसं काम करते? जाणून घ्या त्यामागचं विज्ञान

Talegaon Chakan Highway Traffic : तळेगाव-चाकण महामार्गावर वाहतूक कोंडीचा बुधवार; २२ किलोमीटरच्या टप्प्यात तब्बल ७ तास वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT