सोनं e sakal
अर्थविश्व

चार वर्षानंतर पहिल्यांदाच इतकं घसरलं सोनं

नामदेव कुंभार

सराफा बाजारात आज पुन्हा सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये घसरण पाहायला मिलाली. मंगळवारच्या तुलनेत आज सोनं आणखी घसरलं आहे. बुधवारी प्रति तोळा सोन्याच्या किंमतीमध्ये 235 रुपयांनी घसरण झाली आहे. तर चांदी प्रति किलोच्या किंमतीत 59 रुपयांची घसरण झाली आहे. बुधवारी सोनं प्रति तोळा 46,509 रुपये झालं आहे. तर चांदीची किंमत प्रति किलो 67747 रुपये झाली आहे. जून महिन्यात सातत्यानं सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. मागील चार वर्षांत एका महिन्यात पहिल्यांदाच सोन्याच्या किंमतीमध्ये इतकी घसरण पाहायला मिळाली.

मागील 11 आठवड्यापासून सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. MCX वर या महिन्यात सोन्यामध्ये 4.5 टक्के घसरण पाहायला मिळाली. तर कॉमेक्सवर 8 टक्केंनी घसरण पाहायला मिळाली आहे. जून 2016 नंतर सोन्यामध्ये इतकी मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिजर्व्हच्या Hawkish कमेंट्रीमुळे सोन्यामध्ये इतकी घसरण पाहायला मिळ्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. तसेच डॉलरच्या घसरणीमुळेही सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली.

जून महिन्यात आतापर्यत प्रति तोळा सोन्याची किंमत दोन हजार 700 रुपयांनी घसरली आहे. गेल्या वर्षी सोनं प्रति तोळा 56 हजार 200 रुपयांवर पोहचलं होतं. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोनं दहा हजार रुपयांनी कमी आहे. सध्या सोन्याची किंमत 46 हजार ते 47 हजार रुपये प्रति तोळा इतकी आहे. दरम्यान, MCX वर चांदीच्या किंमतीमध्येही आज घसरण पाहायला मिळाली. MCX वर चांदीची किंमत प्रति किलो 67,500 रुपयांवर पोहचली आहे. या महिन्यात MCX वर चांदीची किंमत सह टक्क्यांनी घसरली आहे तर कॉमेक्सवर आठ टक्क्यांनी चांदीमध्ये घसरण पाहायला मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: What a Catch! शुभमन गिलचा श्रीलंकेला स्तब्ध करणारा झेल, भारताच्या फिरकीसमोर यजमान फेल! Video Viral

Model Antara Banerjee FIR : अभिनेत्रीचा धावत्या ट्रेनमध्ये RPF जवानावर रेझर ब्लेडने हल्ला; आधी स्वत:चे कपडे काढले अन् मग...

आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या पडद्यावर सलमान-संजयची जोडी झळकणार, '7 डॉग्स' कधी होणार प्रदर्शित?

Sunetra Pawar: अजितदादांचा विकासाचा वारसा अर्ध्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा निर्धार, महिलांसाठी ‘दादा उद्योगिनी’ ॲप

Loggerhead Turtle: अरबी समुद्रातून १०० किलो वजनाच्या दुर्मिळ 'लॉगरहेड' कासवाची सुटका

SCROLL FOR NEXT